हुंबरठ येथे गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक रोखली, सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 16:52 IST2022-02-21T16:51:38+5:302022-02-21T16:52:46+5:30
डिसेंबर नंतर उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिसांकडून मद्य कारवाया करणे जवळपास बंदच होते. त्यामुळे बेकायदा मद्य वाहतुकीला सध्या ऊत आला आहे

हुंबरठ येथे गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक रोखली, सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
कणकवली : गोव्यातून सिंधुदुर्गकडे होणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्य वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने कारवाई केली. ही कारवाई मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर हुंबरठ येथे करण्यात आली.
या कारवाईत गोल्डन एसब्ल्यू व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या एकूण ७९२ मद्याच्या बाटल्या पकडण्यात आल्या. तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी सुनील एकनाथ गावडे (३३, रा. वागदे कणकवली) या तरुणावर कारवाई करण्यात आली.
डिसेंबर नंतर उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिसांकडून मद्य कारवाया करणे जवळपास बंदच होते. त्यामुळे बेकायदा मद्य वाहतुकीला सध्या ऊत आला आहे. जवळपास दीड महिन्यांनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
या कारवाई पथकात निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक के. डी. कोळी, काँस्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे, योगेश शेलार यांचा समावेश होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक के. डी. कोळी करीत आहेत.