गोवा-कोकणच्या सीमारेषेवर इचलरंजीच्या दोघांना या कृत्याबद्दलच अटक केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 16:34 IST2020-05-02T16:31:01+5:302020-05-02T16:34:03+5:30
या अवैध दारू वाहतूक प्रकरणी १२ लाखांचा ट्रक मिळून १२ लाख ६४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आमिर आदम वाळवेकर व हसन अल्लाउद्दीन पटेकरी (दोघेही रा. इचलकरंजी, कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.

बांदा-पत्रादेवी येथील पोलीस तपासणी नाक्यावर ट्रकातून नेण्यात येत असलेली दारू जप्त करण्यात आली
बांदा : लॉकडाऊन असताना केवळ अत्यावश्यक सेवेचा परवाना असल्याचा गैरफायदा अनेक वाहनधारक असल्याचे उघड झाले आहे. अशाच छुप्या पद्धतीने गोव्यातून कोल्हापूर येथे ट्रकमधून अवैधरित्या दारू नेण्याचा प्रयत्न बांदा पोलिसांनी हाणून पाडला. या कारवाई ६४ हजार ७१० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. तसेच याप्रकरणी कोल्हापूर-इचलकरंजी येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.
गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर बांदा पोलीस गोव्यातून येणा-या वाहनांची कसून तपासणी करत असताना बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी महेश भोई यांना एका ट्रकचा संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता आत गोवा बनावटीची दारू आढळून आली.
या अवैध दारू वाहतूक प्रकरणी १२ लाखांचा ट्रक मिळून १२ लाख ६४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आमिर आदम वाळवेकर व हसन अल्लाउद्दीन पटेकरी (दोघेही रा. इचलकरंजी, कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद, एच.जे.धुरी, दीपक शिंदे, सुमित चव्हाण, रवींद्र देवरुखकर, दिलीप धुरी, मनीष शिंदे यांनी केली.