शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 09:16 IST

Narayan Rane : काल खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले.

Narayan Rane : राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दुसरीकडे, काल (रविवारी) सिंधुदुर्गमध्ये खासदार नारायण राणे यांनी समर्थकांसह मोठे शक्ती प्रदर्शन केले. राणे समर्थकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती, यावेळी राणे यांनी मोठे विधान केले. शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचा किस्सा राणेंनी सांगितला. 'मी एका उपशाखाप्रमुखाची हत्या करणार होतो, पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी मला समजावलं असल्याचे राणेंनी सांगितले. 

भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?

नारायण राणे म्हणाले, “माझ्या मित्राने मला सांगितलं तू निघू नकोस, आम्ही येतो. नेहमीच्या रस्त्याने तू जायचं नाही. एकाने तुझी टीप दिली आहे. टीप देण्याऱ्याचं मला नाव कळलं. मी त्यांना बोललो मी लगेच येतो. मी लगेच गाडी काढली आणि थेट त्या माणसाच्या घरी गेलो. मी दरवाजा नॉक केला. त्या उपशाखाप्रमुखाच्या पत्नीने मधला दरवाजा उघडला. मी तिला सांगितलं की मी तुझ्या पतीला ठार मारणार.

"यानंतर दुसऱ्या दिवशी मला बाळासाहेब ठाकरेंनी बोलावलं. मी तिकडे गेलो, तिकडे तो उपशाखाप्रमुखही बसला होता. बाळासाहेब म्हणाले तू या उपशाखाप्रमुखाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला बोललास ठार मारणार? तर मी म्हणालो की हो ठार मारणार. परत बाळासाहेब म्हणाले की मी तुला विचारतोय, तरी तू मारणार म्हणतोस.. मी म्हणालो, या माणसाने दाऊदच्या माणसाला माझी टीप द्यायची ठरवलं, मी त्याला जिवंत ठेवलं तर मी मरणार, त्यापेक्षा मी याला मारलं तर मी जगणार, असं राणे म्हणाले. "तेवढ्यात  बाळासाहेब ठाकरे म्हणाले, नारायण मी तुला एक विनंती करू का. मी तुला सांगतो, तू त्याला जीवनदान देऊ शकतोस का? मी म्हणालो साहेब तुम्ही जे सांगाल ते होईल. बाळासाहेबांनी सांगितले म्हणून मी त्याला जीवनदान दिले. हा किस्सा काल राणे यांनी भरसभेत सांगितला. 

सिंधुदुर्गात नारायण राणेंचं शक्तिप्रदर्शन

एकीकडे राज्यात मुंबईसह एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे आज कोकणातील सिंधुदुर्गामध्येभाजपाचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी गोव्याच्या सीमेजवळ असलेल्या बांद्यापासून ते कणकवलीपर्यंत राणे समर्थकांनी रॅली काढत आपण राणेंसोबत असल्याचा संदेश दिला. तर नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीवेळी आमने-सामने आलेले भाजपाचे आमदार व मंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे हे बंधूसुद्धा हसत खेळत एकत्र आलेले दिसले. दरम्यान, कणकवली येथे झालेल्या मेळाव्यातून मला ऊर्जा मिळाली आहे. मतभेद निर्माण करणाऱ्यांना थारा देऊ नका, असं आवाहनही नारायण राणे यांनी केलं.

डिसेंबर महिन्यात झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये मुख्य लढत झाली होती. तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे आमदार, मंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे हे आमने-सामने आले होते. तसेच या निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांमुळे राणे कुटुंबांमध्ये मतभेद झाल्याची चर्चाही सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गात ‘एकच ना.रा.’ असे सूचक बॅनर लागले होते. दरम्यान, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये विभागलेल्या राणे समर्थकांनी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी नारायण राणेंचं स्वागत करण्यासाठी नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यासोबत शिंदेसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हेसुद्धा उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Narayan Rane recounts Balasaheb Thackeray stopping him from murder.

Web Summary : Narayan Rane revealed how Balasaheb Thackeray prevented him from killing a Shiv Sena member who had informed on him. Rane, during a show of strength in Sindhudurg, recounted the incident, emphasizing Thackeray's intervention and his subsequent decision to spare the man's life.
टॅग्स :Narayan Raneनारायण राणेBJPभाजपाkonkanकोकण