शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

पत्नीच्या छळप्रकरणी पतीला अटक, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:08 AM

पहिले लग्न झालेले असताना त्याची जाणीव न करून देता दुसरे लग्न करून त्या पत्नीचा छळ करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील पुळास येथील संभाजी रामा निकम (४७) याला कुडाळ पोलिसांनी अटक केली असून, मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबतची तक्रार त्याची दुसरी पत्नी स्वरूपा संभाजी निकम हिने कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.

ठळक मुद्देपत्नीच्या छळप्रकरणी पतीला अटकसंभाजी निकम याच्याविरोधात गुन्हा दाखल

कुडाळ : पहिले लग्न झालेले असताना त्याची जाणीव न करून देता दुसरे लग्न करून त्या पत्नीचा छळ करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील पुळास येथील संभाजी रामा निकम (४७) याला कुडाळ पोलिसांनी अटक केली असून, मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबतची तक्रार त्याची दुसरी पत्नी स्वरूपा संभाजी निकम हिने कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.तक्रारीत स्वरुपा यांनी म्हटले आहे, माझ्या राशीमध्ये मंगळ असल्यामुळे विवाह जुळत नव्हता. म्हणून भाऊ पुळास येथील संभाजी निकम यांच्याकडे घेऊन गेला. ते देवदेवतांच्या माध्यमातून लग्न जुळविण्याचे काम करायचे. नोव्हेंबर २०१८ पासून सातत्याने लग्न जुळविण्यासाठी तेथे गेल्यावर संभाजी निकम यांनी तुझे लग्न होणे अशक्य आहे. तुला मंगळ आहे. पण मी तुझ्याशी लग्न करू शकतो. माझे लग्न झालेले नाही, असे सांगितले.या लग्नाला मुलीच्या घरातून विरोध होता. तरीही ९ जून २०१९ रोजी हुमरस येथील उषा मंगल कार्यालय येथे संभाजी निकमसोबत स्वरुपा यांनी विवाह केला. हा विवाह झाल्यानंतर काही दिवसांसाठी माणगाव येथे भाड्याने राहते घर घेतले. त्यानंतर निकम याने आपला याअगोदर विवाह झाला आहे, असे सांगून पहिल्या पत्नीला कॅन्सर असल्याचे सांगितले. दोन मुलेसुद्धा असल्याचे सांगितले.त्यानंतर तो स्वरुपा यांना पुळास येथे घेऊन गेला. काही दिवस पत्नीप्रमाणे वागणूक देऊन त्यानंतर मारहाण तसेच छळ करायला सुरुवात केली. जर माहेरच्या लोकांकडून पैसे आणले नाहीस तर तुला ठार मारीन, अशी धमकी देऊन सातत्याने मानसिक छळ केला, अशी तक्रार स्वरुपा यांनी दिली. या तक्रारीनुसार संभाजी निकम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग