खासगी बस-दुचाकीच्या भीषण अपघातात दोघे ठार!, मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:51 IST2022-04-11T13:45:05+5:302022-04-11T16:51:21+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील कासार्डे जांभूळवाडी येथे खासगी बस व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले.

खासगी बस-दुचाकीच्या भीषण अपघातात दोघे ठार!, मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे येथील घटना
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील कासार्डे जांभूळवाडी येथे खासगी बस व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले. अंकुश सोनू घाडी, राजश्री घाडी (रा. चांदोशी, तळेबाजार, ता. देवगड) अशी मृत दोघांची नावे आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे येथे काल, रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, गोव्यावरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसने दुचाकीला मागून जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. कासार्डे येथील घरी जात असताना मागून खासगी बसने दुचाकीस जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानी घटनेचा पंचनामा केला. तसेच महामार्ग पोलीस निरीक्षक अरुण जाधव व पथकाने महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.