शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

हिंसाचार करणारे सगळे एकाच धर्माचे कसे?, मंत्री नितेश राणेंचा सवाल

By सुधीर राणे | Updated: March 28, 2025 17:38 IST

भाजप पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग देखील ठाकरेंना खुपतोय

कणकवली: हिंदुत्वाच्या मुद्दयावरून उद्धव ठाकरे आमच्यावर सातत्याने टीका करत आहेत. पण भगव्याचा द्वेष करणाऱ्या आणि हिरव्याचे लांगुलचालन करणाऱ्या ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यात, देशात हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सगळे एकाच धर्माचे कसे आढळतात ? आणि त्याविरोधात आम्ही आवाज उठवला तर आम्ही चुकीचे कसे ठरू शकतो असा सवाल पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री राणे म्हणाले, भाजप पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग देखील ठाकरेंना खुपतोय. तो काढावा अशी ते मागणी करत आजहेत. पण आमचा झेंडा कसा दिसावा याची चिंता त्यांनी करू नये. कारण आता भगवा आणि ठाकरे यांचा काहीही संबंध राहिलेला नाही.मुख्यमंत्री होवून देखील ठाकरेंना संवैधानिक प्रक्रियांची माहिती नाही. विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवल्यावरून ते टीका करत आहेत. वस्तुतः जो कायदा देशाला तोच राज्याला लागू होतो. संसदेमध्ये विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने संसदेत विरोधी पक्ष नेता नव्हता. तशीच स्थिती राज्यात आहे. पण ठाकरेंना कायद्याचा कोणताही अभ्यास नाही.देशात, राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व हिंसाचारामधील आरोपी हे एकाच धर्माचे आहेत. त्यामुळेच आम्ही त्या विरोधात आवाज उठवत आहोत. आम्हाला हिंदूत्व शिकवणाऱ्यांनी कधी त्या धर्मातील उन्मादींना संविधान शिकवलं आहे का? त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे का? हे आधी तपासून पहावं, असेही मंत्री राणे म्हणाले.दरम्यान, आमचं राज्य प्रगतशील राज्य म्हणून अधिक भक्कमपणे पुढे जाणार आहे. राज्य हिताचे मुद्दे तसेच विधेयक मांडण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या उलट विरोधी पक्षात ताळमेळ राहिलेला नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून विरोधक अपयशी ठरले आहे. जनतेने आम्हाला जनमताचा मोठा कौल दिलाय. त्यामुळे आगामी पाच वर्षात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर दिसेल.

निधी खर्च करण्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी कंटाळा केलासिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निधी खर्च करण्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी थोडा कंटाळा केला. योग्य नियोजन केले नाही. पण त्यांना आम्ही समज दिली आहे. ज्या गोष्टी चौकटीत बसत नव्हत्या. त्यामध्ये आम्ही सुधारणा करून निधी योग्य पद्धतीने खर्च केला. जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी योग्य नियोजन आम्ही केले आहे, असेही राणे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गministerमंत्रीNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेHinduismहिंदुइझम