शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आशा संघटना पुन्हा आंदोलन करणार

By admin | Updated: July 23, 2014 21:56 IST

कोणत्याही मागण्यांची पूर्तता न झाल्याने निर्णय

सावंतवाडी : विविध मागण्यांसंदर्भात १ जुलै रोजी आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन करुनही कोणत्याही मागणीची पूर्तता झाली नाही. त्यामुळे शासनाने याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सावंतवाडी तालुका आशा व गटप्रवर्तक संघटनेने तहसीलदार सतीश कदम यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी सचिका पवार, राजश्री नाईक, श्रेया कुडतरकर, अनुष्का गोवेकर, कांचन देऊस्कर, किशोरी बांदेकर, सुधा बांदेकर, हेमांगी गोवेकर, अस्मिता नाईक, शीतल शिरसाट, गायत्री कांडरकर उपस्थित होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील आशा व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य शासनाने आगामी निवडणुकांपूर्वी ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आशा व गटप्रवर्तकांना ग्रामीण पातळीवर आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे, आशांना सात हजार, तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन सुरू करावे, त्यांच्या कुटुंबियांना मेडिक्लेम लागू करावा, ग्रामपंचायत व आरोग्य खात्याकडून सन्मानाची वागणूक मिळावी, आशांना सर्व औषधांनीयुक्त मेडिकल किट्स व आवश्यक साधने पुरावावीत, राष्ट्रीय आरोग्य अभियान सुकाणू समितीने ४ जानेवारी रोजी केलेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी आणि जनतेचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनेही योजना करून निधीत भरघोस वाढ करावी, अशा विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)