शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ऐतिहासिक मालवणनगरीला आदर्शवत पर्यटनस्थळ बनविणार! :उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 4:47 PM

Malvan, Uday Samant , sindhudurg रॉक गार्डनमधील म्युझिकल फाऊंटन पर्यटकांसाठी अनोखी पर्वणी ठरेल. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ऐतिहासिकपणा लाभलेले मालवण शहर कोकणातील आदर्शवत पर्यटनस्थळ बनवू, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ठळक मुद्देऐतिहासिक मालवणनगरीला आदर्शवत पर्यटनस्थळ बनविणार! :उदय सामंत मालवणात पाच कोटींच्या विकासकामांची सुपरफास्ट भूमिपूजने

मालवण : रॉक गार्डनमधील म्युझिकल फाऊंटन पर्यटकांसाठी अनोखी पर्वणी ठरेल. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ऐतिहासिकपणा लाभलेले मालवण शहर कोकणातील आदर्शवत पर्यटनस्थळ बनवू, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

शहरातील विविध प्रकल्प आणण्यासाठी, शहरात सोयी सुविधा अधिक निर्माण करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत व सहकारी सर्व नगरसेवक करीत असलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. त्यामुळे शहर विकासासाठी कोट्यवधी रुपये निधी मंजूर होत आहे.

मालवण येथील रॉक गार्डन येथे पालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोकणातील एकमेव अशा म्युझिकल फाऊंटन प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

त्याचबरोबर मालवण नगरपरिषद येथे अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम प्रकल्पासाठी २ कोटी एक लाख ४ हजार निधी मंजूर, १ कोटी ८१ लाख ३७ हजार निधीतून भाजी मार्केट इमारत बांधकाम करणे, १ कोटी २५ लाख निधीतून धुरीवाडा साईमंदिर जवळ क्रीडा संकुल ठिकाणी प्रमाणित बॅडमिंटन हॉल उभारणी या सुमारे पाच कोटी रुपयांच्या तीन प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर व बांधकाम सभापती यतीन खोत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, दीपक पाटकर, पंकज सादये, गणेश कुशे, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, आरोग्य सभापती पूजा सरकारे, तृप्ती मयेकर, पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटये, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, काँग्रेसचे बाळू अंधारी, पल्लवी तारी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनाराUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग