शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार

By admin | Updated: December 28, 2015 00:22 IST

दीपक केसरकर : देवगड घटनेबाबत समिती नेमून अहवाल मागविला जाईल

देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी असून, याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. याबाबत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. घडलेल्या घटनेसाठी समिती नेमून चौकशी करून अहवाल मागविला जाईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. दीपक केसरकर रविवारी देवगड दौऱ्यावर आले होते. त्यांनी मृत संदीप कावले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदतही दिली. तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघा रुग्णांची विचारपूस केली. देवगड ग्रामीण रुग्णालयात जाऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, संजय पडते, आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन बिलोलीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश नलावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. भगत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले की, झालेली घटना ही दुर्दैवी असून, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. कावले कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रुग्णालयातील सोयी-सुविधा, अपुरी कर्मचारी संख्या, रुग्णांच्या गरजा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने याबाबत चर्चा केली. येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्याबाबत चर्चा केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालय म्हणून याला प्रशासकीय मान्यता मिळाली असली तरी तांत्रिक मान्यता व निधीची तरतूद झाली नसल्याचे डॉ. बिलोलीकर यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)इंजेक्शने तपासणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविणारसिंंधुदुर्ग जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या साहाय्यक आयुक्त पी. एस. अय्यर यांनी रविवारी रुग्णालयात भेट देऊन तपासणी केली. कालावधी कमी असल्याने संबंधित बॅचची इंजक्शने तपासणीसाठी बांद्रा मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.