शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांना विशेष आर्थिक पॅकेजद्वारे मदत करा, खासदार नारायण राणे यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:23 IST

जिल्ह्यात या वर्षी सामान्य उत्पादनाच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन सुमारे ८५ ते ९० टक्के कमी होऊ शकते

कणकवली : सततच्या हवामानातील बदलामुळे आंबा पिकाचे नुकसान होत आहे. अवकाळी पाऊस, दीर्घकाळपर्यंत थंडी आणि फुलधारणेच्या काळात वाढलेली आर्द्रता आंबा पिकासाठी धोकादायक ठरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.खासदार राणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक बागांमध्ये आंब्याला आलेला मोहोर सुकला, जळून गेला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळगळ दिसून आली आहे. कृषी विभाग आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आंबा बागायतींची तपासणी केली. या तपासणी अहवालातील निष्कर्षांनुसार परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात या वर्षी सामान्य उत्पादनाच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन सुमारे ८५ ते ९० टक्के कमी होऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्हा जगप्रसिद्ध हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. हजारो शेतकरी त्यांच्या उपजीविकेसाठी पूर्णपणे या पिकावर अवलंबून आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.ही बाब लक्षात घेता पिकांच्या नुकसानीचे केंद्रीय पथकाकडून मूल्यांकन करण्यात यावे. बाधित आंबा शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत पॅकेज द्यावे. केंद्रीय कृषी योजनांअंतर्गत मदत वाढविण्यात यावी. तसेच कोकणातील बागायती पिकांवर हवामान बदलाचा होणारा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा विचार करावा. बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rane seeks financial aid for Sindhudurg mango farmers from Centre.

Web Summary : Narayan Rane urges central assistance for Sindhudurg mango farmers facing crop losses due to erratic weather. He requested a special financial package after crop damage assessments revealed an expected 85-90% production decrease, threatening farmers' livelihoods. Rane also asked for long-term climate change solutions.