शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

६५ गावांमध्ये प्लास्टिक पिकअप डे -: ९७० किलो कचरा गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 7:04 PM

मालवण तालुक्यातील ६५ गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्लास्टिकचा वापर टाळण्याबरोबर स्वच्छतेविषयक शपथ घेण्यात आली. प्लास्टिक बाटल्या ४०३ किलो व कॅन, तेलाच्या पिशव्या, औषधांच्या बाटल्या १४५ किलो एवढा कचरा गोळा केला.

ठळक मुद्देअधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

मालवण : येथील पंचायत समितीच्यावतीने तालुक्यात बुधवारी प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी पिकअप प्लास्टिक डे महाश्रमदान कार्यक्रम घेण्यात आला. यात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सरपंच यांच्यासह शालेय विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमात ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. विविध गावातून ९७० किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.

मालवण तालुक्यातील ६५ गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्लास्टिकचा वापर टाळण्याबरोबर स्वच्छतेविषयक शपथ घेण्यात आली. त्यानंतर मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समितीच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शालेय विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तालुक्यात विविध ठिकाणी प्लास्टिक पिकअप डे महाश्रमदान उपक्रम राबविण्यात आला.

यात तालुक्यात कॅरीबॅग्ज, पातळ पिशव्या १९८ किलो, अपारदर्शक प्लास्टिक दुधाच्या पिशव्या ११४ किलो, वेफर्स पाकिटे, कुरकुरे, फ्रुटी, बिस्कीट पुडे यांचे रॅपर ११० किलो, प्लास्टिक बाटल्या ४०३ किलो व कॅन, तेलाच्या पिशव्या, औषधांच्या बाटल्या १४५ किलो एवढा कचरा गोळा केला.प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणाततालुक्यातील ६५ गावांमधून ९७० किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. यात तालुक्यात कॅरीबॅग्ज, पातळ पिशव्या, अपारदर्शक प्लास्टिक दुधाच्या पिशव्या, वेफर्स पाकिटे, कुरकुरे, प्लास्टिक बाटल्या व कॅन, तेलाच्या पिशव्या, औषधांच्या बाटल्या आदी प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात दिसून आला.प्लास्टिक पिकअप डे निमित्त मालवण किनारपट्टीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान