गुलदार प्रकल्प निवती समुद्रातच करा; तारकर्ली, देवबाग, भोगवे ग्रामपंचायतींची पालकमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 19:28 IST2025-03-29T19:27:31+5:302025-03-29T19:28:00+5:30

मालवण: महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड MMB ने MTDC ला पाठवलेल्या पत्रानुसार युद्धनौका गुलदार जहाज बुडवण्याचे ठिकाण निवती रॉकऐवजी कुणकेश्वर (देवगड ...

Guldar project should be done in the sea only Tarkarli, Devbag, Bhogve Gram Panchayats draw the attention of the Guardian Minister | गुलदार प्रकल्प निवती समुद्रातच करा; तारकर्ली, देवबाग, भोगवे ग्रामपंचायतींची पालकमंत्र्यांकडे मागणी

गुलदार प्रकल्प निवती समुद्रातच करा; तारकर्ली, देवबाग, भोगवे ग्रामपंचायतींची पालकमंत्र्यांकडे मागणी

मालवण: महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड MMB ने MTDC ला पाठवलेल्या पत्रानुसार युद्धनौका गुलदार जहाज बुडवण्याचे ठिकाण निवती रॉकऐवजी कुणकेश्वर (देवगड तालुका) पेथे १७ मीटर खोलीवर बदलण्यात आले आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. निवती रॉक हे मालवण आणि वेंगुर्ले या दोन तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या दोन तालुक्यांच्या विकास शक्य असून गुलदार प्रकल्प निवती समुद्रातच साकारण्यात यावा, अशी मागणी तारकर्ली, देवबाग व भोगवे ग्रामपंचायतींनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली. 

पत्रात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉकनजीकच्या समुद्रात प्रस्तावित भारतीय नौदलाच्या निवृत्त युद्ध नौका आयएनएस गुलदारचे पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प हा महाराष्ट्राच्या जल पर्यटनाला जागतिक दर्जा प्राप्त करून देणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्र शासनानेही २०१९ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली असून त्यामुळे विद्यमान स्कुबा आणि जल पर्यटन उद्योगाला बळकटी मिळणे अपेक्षित आहे. 

सध्याचा MMB आणि MTDC चा दृष्टिकोन हा MTDC ने तयार केलेल्या आणि केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालाशी विसंगत आहे. हा अहवाल पर्यटन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार करण्यात आला होता आणि त्यात निवती रॉक परिसराची निवड स्पष्टपणे नमूद आहे. कुणकेश्वर आणि १७मीटर खोलीचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला? यासाठी वैज्ञानिक अभ्यास सरकारच्या कोणत्या संस्थेने केला आहे का? यासाठी परवानगी घेतली आहे का? जर नसेल, तर हा बदल अहवाल आणि पर्यटन मंत्रालयाशी केलेल्या कराराचा भंग ठरत नाही का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. 

हा प्रकल्प भारतातील पहिलाच प्रयोग आहे आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा, असा टप्पा गाठण्याची संधी आहे. परंतु सध्याच्या नियोजनामुळे आणि कुणकेश्वर येवील अयोग्य ठिकाणामुळे हा प्रकल्प अयशस्वी होण्याची भीती आहे. तरी, निवती रॉक येथे हा प्रकल्प राबवण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. तसेच, प्रकल्पाची अंमलबजावणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वै ज्ञानिक पद्धतीने होईल आणि केंद्र सरकारच्या अहवालाशी सुसंगत राहील, याची खात्री करावी, अशीही मागणी करण्यात आली.

Web Title: Guldar project should be done in the sea only Tarkarli, Devbag, Bhogve Gram Panchayats draw the attention of the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.