मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, चेंदवण-निरुखेवाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 11:54 IST2019-09-09T11:53:07+5:302019-09-09T11:54:07+5:30

चेंदवण-निरुखेवाडी येथील श्री भवानी मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने मंदिराला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निरुखेवाडीतील पोयरेकर यांच्या घराजवळ हे मंदिर असून डोंगर कड्यावर असल्याने भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

The guard wall of the temple collapsed, incident at Chandvan-Nirukhewadi | मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, चेंदवण-निरुखेवाडी येथील घटना

चेंदवण येथील श्री भवानी मंदिराची संरक्षक भिंत कोसळली.

ठळक मुद्देमंदिराची संरक्षक भिंत कोसळलीचेंदवण-निरुखेवाडी येथील घटना

कुडाळ : चेंदवण-निरुखेवाडी येथील श्री भवानी मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने मंदिराला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निरुखेवाडीतील पोयरेकर यांच्या घराजवळ हे मंदिर असून डोंगर कड्यावर असल्याने भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

गेले बरेच दिवस मुसळधार पावसामुळे डोंगर खचण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अनेक घरांची पडझड होत आहे. यातच शुक्रवारी रात्री अचानक चेंदवण भवानी मंदिराची संरक्षक भिंत कोसळली.

मंदिराला धोका निर्माण झाल्याने तातडीने उपाययोजना न केल्यास मंदिर पूर्णत: कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतची नोंद तहसीलदार कार्यालयात करण्यात आली.
 

Web Title: The guard wall of the temple collapsed, incident at Chandvan-Nirukhewadi