नातवानेच मारला आजीच्या दागिन्यावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:53 IST2019-07-27T12:50:52+5:302019-07-27T12:53:26+5:30

कणकवली तालुक्यातील घोणसरी पिंपळवाडी येथे नातवाने आजीच्या दागिन्यावर डल्ला मारण्याचा प्रकार घडला आहे. ६७ हजार रुपये किमतीची सव्वा दोन तोळ्यांची सोन्याची माळ नातवाने लंपास केली असून आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नातवावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Grandson hit his grandmother's jewelry | नातवानेच मारला आजीच्या दागिन्यावर डल्ला

नातवानेच मारला आजीच्या दागिन्यावर डल्ला

ठळक मुद्देनातवानेच मारला आजीच्या दागिन्यावर डल्लाघोणसरी येथील घटना : सोन्याची माळ लंपास

कणकवली : तालुक्यातील घोणसरी पिंपळवाडी येथे नातवाने आजीच्या दागिन्यावर डल्ला मारण्याचा प्रकार घडला आहे. ६७ हजार रुपये किमतीची सव्वा दोन तोळ्यांची सोन्याची माळ नातवाने लंपास केली असून आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नातवावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

घोणसरी पिंपळवाडी येथे शारदा मारुती साळसकर (६५) ही वृद्ध महिला राहते. ५ जुलै रोजी तिचा नातू अतिश राजेंद्र साळसकर (२२, सध्या राहणार चिपळूण, परशी तिठा) हा घोणसरी येथे आला. तसेच शारदा हिच्याकडे तिचे रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रांची मागणी तो करू लागला. त्या रागाने त्याने शारदा हिला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.

घरातील लाकडीपेटीमधील कागदपत्रे तसेच सव्वा दोन तोळ्यांची सोन्याची माळ घेऊन तो पसार झाला. त्याच्याकडे मागणी करूनही त्याने सोन्याची माळ व कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे शेवटी शारदा हिने पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अतिश याच्यावर गुन्हा नोंद केला असून या घटनेचा तपास फोंडाघाट पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार दयानंद चव्हाण करीत आहेत.

Web Title: Grandson hit his grandmother's jewelry