सिंधुदुर्गातील डिगसमध्ये सापडली केएफडीबाधित गोचीड, माकडताप सक्रिय होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 17:18 IST2023-02-02T17:17:39+5:302023-02-02T17:18:09+5:30
आरोग्य विभागात खळबळ

सिंधुदुर्गातील डिगसमध्ये सापडली केएफडीबाधित गोचीड, माकडताप सक्रिय होण्याची भीती
कुडाळ : डिगस गावातील खांदीचे गाळू येथे केएफडीबाधित गोचीड सापडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
कुडाळ तालुक्यातील डिगस गावातील खांदीचे गाळू येथे केएफडीबाधित गोचीड सापडली आहे. पुणे एनआयव्ही प्रयोगशाळेकडून हा अहवाल सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य यंत्रणेला पाठविण्यात आला असून, आरोग्य यंत्रणेचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश करतसकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, पणदूर येथे भेट देत आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
माकडताप सक्रिय होण्याची भीती
डिगस ग्रामपंचायतीला भेट देत पंचायत सरपंच पुनम पवार यांना याबाबतची कल्पना दिली आहे. याबाबतचे सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी सागर किनळेकर यांनी केले. यावेळी ३८ गोचीड नमुने पुणे एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. यापैकी सर्वच्या सर्व नमुने केएफडीबाधित आले आहेत. मात्र, तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा गोचीड केएफडीबाधित सापडल्याने माकडताप पुन्हा जिल्ह्यात सक्रिय होतोय का ? असा प्रश्न समोर येतोय.