शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

सिंधुरत्न योजना संपूर्ण महाराष्ट्राला द्या, दीपक केसरकर आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 11:43 AM

Deepak Kesarkar Sindhudurg- चांदा ते बांदा योजनेतून समृध्दी आली तेव्हा या योेजनेला जिल्हा बँकेचा हातभार लागला असता तर योजना आणखी यशस्वी झाली असती. मात्र आता ही योजना बदलून सिंधुरत्न या नावाने पुढे येत आहे. योजनेचा लाभ राज्यातील जनतेला व्हावा यासाठी माझा आग्रह कायम राहणार असल्याचे मत माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मांडले.

ठळक मुद्देसिंधुरत्न योजना संपूर्ण महाराष्ट्राला द्या, दीपक केसरकर आग्रही माडखोल दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

सावंतवाडी : शिवरामभाऊ जाधव यांना अभिप्रेत असे काम विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत करत आहेत. त्यामुळे ही बँक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख टिकवून आहे. चांदा ते बांदा योजनेतून समृध्दी आली तेव्हा या योेजनेला जिल्हा बँकेचा हातभार लागला असता तर योजना आणखी यशस्वी झाली असती. मात्र आता ही योजना बदलून सिंधुरत्न या नावाने पुढे येत आहे. पण ही योजनेचा लाभ राज्यातील जनतेला व्हावा यासाठी माझा आग्रह कायम राहणार असल्याचे मत माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मांडले.ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व देसाई डेअरी माडखोल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समृध्दी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सहकार निबंधक कृष्णकांत धुळप, उद्योजक प्रशांत कामत, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, पंचायत समिती सदस्या सुनंदा राऊळ, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई, एम. के. गावडे, प्रभाकर देसाई, प्रज्ञा परब, दत्ताराम कोळमेकर, माडखोल सरपंच संजय शिरसाट आदी उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, शेतकऱ्यांची उन्नती झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी मिळून काम करूया. दुध उत्पादक गट वाढले पाहिजे, यासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करूया, हा प्रकल्प सुरू करत असताना मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरविण्यात आले, पण आम्ही हे गैरसमज दूर केले. यावेळी एम. के. गावडे, प्रभाकर देसाई, कृष्णकांत धुळप आदींनी विचार मांडले. प्रास्ताविक अनिरूध्द देसाई यांनी केले.कर्ज गायी खरेदीसाठी दिले पाहिजे होतेमाजी मंत्री दीपक केसरकर यांनी बोलण्याच्या ओघात जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना चिमटा काढला. तुम्ही राजकीय पक्षांना गाड्यासाठी कर्ज देण्यापेक्षा गायी खरेदीसाठी कर्ज दिले असते तर ते वेळेत मिळाले असते, असे सांगत सावंत यांची फिरकी घेतली. सावंत हे सर्वात यशस्वी अध्यक्ष आहेत. भविष्यात त्यांनी आमदार झाले तरी अध्यक्षपद कायम ठेवावे, असेही केसरकर म्हणाले. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Milk Supplyदूध पुरवठाsindhudurgसिंधुदुर्ग