सिंधुदुर्ग: वेगुर्ले मठ येथील युवतीचा गळा दाबून खून, बागेमध्ये आढळला मृतदेह

By अनंत खं.जाधव | Updated: August 29, 2022 12:49 IST2022-08-29T12:10:21+5:302022-08-29T12:49:26+5:30

मृत युवती दोन दिवसांपासून होती बेपत्ता

Girl killed by strangulation at Vegurle Math Sindhudurg district, The body was found in the garden next to the house | सिंधुदुर्ग: वेगुर्ले मठ येथील युवतीचा गळा दाबून खून, बागेमध्ये आढळला मृतदेह

संग्रहित फोटो

सिंधुदुर्ग: वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील २२ वर्षीय युवतीचा मृतदेह बागेमध्ये आढळून आला. मृत युवतीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा संशय वेंगुर्ले पोलिसांनी व्यक्त केला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावरच काल, रविवारी रात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मृत युवती कुडाळ येथे कामाला होती. मात्र दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याने तिचा शोध घेण्यात येत होता. अशातच तिचा मृतदेह काल, रविवारी रात्री उशिरा घराशेजारील बागेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी वेंगर्ले पोलीस अधिक तपास करीत असून तिघांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Girl killed by strangulation at Vegurle Math Sindhudurg district, The body was found in the garden next to the house