तिलारी नदीवरील कॉजवेवरून घोटगेवाडीचे पोलीसपाटील गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 17:41 IST2020-09-01T17:27:06+5:302020-09-01T17:41:47+5:30

तिलारी नदीच्या घोटगेवाडी येथील कॉजवे वरून घरी चालत जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्याच गावचे पोलीस पाटील विश्राम गोविंद दळवी (४५) हे वाहून गेले.

Ghotgewadi police went to the causeway on the river Tilari | तिलारी नदीवरील कॉजवेवरून घोटगेवाडीचे पोलीसपाटील गेले वाहून

तिलारी नदीवरील कॉजवेवरून घोटगेवाडीचे पोलीसपाटील गेले वाहून

ठळक मुद्देतिलारी नदीवरील कॉजवेवरून घोटगेवाडीचे पोलीसपाटील गेले वाहूनदोडामार्ग पोलिस व ग्रामस्थांकडून शोधाशोध सुरू

दोडामार्ग :  तिलारी नदीच्या घोटगेवाडी येथील कॉजवे वरून घरी चालत जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्याच गावचे पोलीस पाटील विश्राम गोविंद दळवी हे वाहून गेले.

तिलारी नदीच्या घोटगेवाडी येथील कॉजवे वरून घरी चालत जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्याच गावचे पोलीस पाटील विश्राम गोविंद दळवी (४५) हे वाहून गेल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी घडली . याबाबतची माहिती उपसरपंच भालचंद्र कुडव यांनी दिली.

दोडामार्ग पोलीस ठाण्यातही याबाबत कळविण्यात आले असून पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत . ग्रामस्थ नदीपात्रात शोधमोहिम घेत असून उशिरापर्यंत ते आढळून आले नव्हते.

Web Title: Ghotgewadi police went to the causeway on the river Tilari