वेंगुर्ला (जि.सिंधुदुर्ग) : तुळस येथील शिवाजी हायस्कूलनजीक रस्त्यावर उभ्या असलेल्या मारुती ओमनी आणि ऑटो रिक्षावर गव्यांच्या झुंजीतील एक गवा या दोन्ही गाड्यांना आदळून अपघात झाला. या अपघातात सावंतवाडी सोनुर्ली येथील ओमनी चालक लक्ष्मण राम जाधव (वय ३१), रामा लक्ष्मण जाधव (६५), तर वेंगुर्ला येथील रिक्षा चालक गोविंद रामचंद्र जाधव व त्यांची मुलगी धनश्री गोविंद जाधव हे जखमी झाले.तुळस शिवाजी हायस्कूलनजीक माळकरवाडी येथे सोमवारी सायंकाळी ७:४५ च्या दरम्यान गव्यांचा कळप जात असताना कळपातील दोन गवे झुंजत आले अणि रस्त्यावर उभ्या असलेल्या ओमनी व रिक्षाला जोरदार आदळले. या घटनेत ओमनी आणि रिक्षाचे मोठे नुकसान झाले.ओमनी चालक सावंतवाडी सोनुर्ली येथील लक्ष्मण रामा जाधव हे जखमी होऊन गाडीच्या काचा त्यांच्या चेहऱ्यात घुसल्या, तर बाजूला बसलेले त्यांचे वडील रामा लक्ष्मण जाधव यांच्या डोक्याला मार लागला. या दोघांवर तुळस आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून सावंतवाडी येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.तर दुसरा गवा रिक्षाला आदळल्याने रिक्षा शेजारी असलेल्या चरात पलटी झाली. यात वेंगुर्ला येथील रिक्षाचालक गोविंद रामचंद्र जाधव व त्यांची मुलगी धनश्री गोविंद जाधव यांना दुखापत झाली. त्यांच्यावर तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
Web Summary : In Sindhudurg, a buffalo fight led to an accident near Tulsi, injuring four. A buffalo collided with an Omni and rickshaw, hurting the drivers and passengers. The injured received treatment at Tulsi Primary Health Center and were moved to Sawantwadi for further care.
Web Summary : सिंधुदुर्ग में, भैंसों की लड़ाई के कारण तुलसी के पास दुर्घटना हुई, जिसमें चार लोग घायल हो गए। एक भैंस ओमनी और रिक्शा से टकरा गई, जिससे ड्राइवर और यात्री घायल हो गए। घायलों को तुलसी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में इलाज मिला और उन्हें आगे की देखभाल के लिए सावंतवाड़ी ले जाया गया।