शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Ganpati Festival : पर्यावरणपूरक सजावटीकडे भर, दुकाने सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 13:35 IST

घराघरातून मखर सजावटीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्ती आकर्षक दिसण्यासाठी मखर सजावट केली जात आहे. बाजारातही मखर सजावट साहित्याची दुकाने सजली आहेत.

ठळक मुद्देपर्यावरणपूरक सजावटीकडे भर, दुकाने सजली मखर सजावटीच्या कामांची लगबग

सुनील गोवेकर

आरोंदा : गणेश चतुर्थी सण जवळ आला की कोकणवासीयांच्या आनंदाला पारावर नसतो. या वार्षिक उत्सवात घर सजावटीबरोबरच गणपतीची आरास करण्याकडे प्रत्येकाचा लक्ष असतो. विद्युत रोषणाईबरोबरच महत्त्वाची असते मखर सजावट.

घराघरातून मखर सजावटीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्ती आकर्षक दिसण्यासाठी मखर सजावट केली जात आहे. बाजारातही मखर सजावट साहित्याची दुकाने सजली आहेत.यावर्षी थर्माकोल व प्लास्टिकला पूर्णपणे बंदी असल्याने पर्यावरणपूरक मखर सजावट केली जाणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी मखरे कागदी पुठ्ठे, बांबू तसेच इतर साहित्यापासून बनविली जाणार असून, एक वेगळीच के्रझ निर्माण करण्याचा प्रयत्न घराघरातून केला जाणार आहे. आकर्षक मखरे बनविण्याच्या कामाला वेग आला असून, गणेश सजावटीमध्ये ही मखरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.सिंधुदुर्गात घराघरात गणेश पूजन केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात मखरांची मागणी असते. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीपासूनच सजावटीच्या कामाची लगबग सुरू होत असल्याने दहा-बारा दिवस आधी बाजारातही मखरांची दुकाने थाटली जातात.

हा व्यवसायही बऱ्यापैकी चालत असल्याने छोट्या-मोठ्या शहरात तयार मखरांची दुकाने थाटली आहेत. या दुकानांतही मखरांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. कागदी पुठ्ठा, बांबू तसेच इतर विविध प्रकारच्या साहित्यापासून यावर्षी पर्यावरणपूरक इको फ्रेंडली मखरे पहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर सजावटीमध्ये विविधताही दिसून येणार आहे.रोषणाईच्या साहित्य खरेदीवर भरया सजावटीमध्ये मखरांबरोबरच महत्त्व असते ते माटवी सजावटीला. माटवी सजावटीसाठी लागणारे पारंपरिक साहित्य गोळा करण्याचीही लगबग सुरू झाली आहे. दोन दिवस आधीपासून माटवी सजावटीसाठी लागणारे साहित्य बाजारात उपलब्ध होत असून, साहित्य विक्रेत्यांबरोबरच खरेदी करणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

गणेशोत्सवात विद्युत रोषणाईलाही तेवढेच महत्त्व असून, रोषणाईचे साहित्य खरेदी करण्याकडेही गणेशभक्तांचा ओढा असतो. इलेक्ट्रिक साहित्याची दुकानेही गजबजू लागली असून, या दुकानांमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.पर्यावरण संवर्धनासाठी इको-फ्रेंडली मखरशासनाने थर्माकोल व प्लास्टिकवर बंदी घातल्याने यावर्षी इको-फ्रेंडली मखरे असणार आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्याबरोबरच कागदी पुठ्ठे, बांबू तसेच इतर साहित्यापासून मखरे बनविली जाणार असून, एक वेगळी कलाकुसर मखर बनविणाऱ्या कारागिरांकडून पहावयास मिळणार असल्याचे मळेवाड येथील प्रसिद्ध कारागीर दीपक चौगुले यांनी सांगितले. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्ग