शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: नोकरीच्या आमिषाने १६.४७ लाखांचा गंडा, कोल्हापूरच्या तोतया पोलिसाचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 13:07 IST

सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ओरोस : स्वतः पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करून पोलिस भरतीमध्ये काम करतो आणि राज्य गुप्तवार्ता आणि शिपाई पदावर लावतो असे आमिष दाखवून तब्बल १६ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम लाटली. त्या व्यक्ती विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बळवंत गुरव (३९,रा. संस्कार बंगला, शांती उद्यान, आपटेनगर, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे; मात्र तक्रारदार यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.संशयित संदीप गुरव याने आपण पोलिस खात्यात अधिकारी असून आपण पोलिस भरतीत राज्य गुप्तवार्ता आणि पोलिस शिपाई पदावर लावतो असे सांगून भरतीचे आमिष दाखवून १० जानेवारी २०२३ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत तक्रारदाराकडून आंबोली, ओरोस आणि कोल्हापूर येथून वेळोवेळी लाखो रुपये गोळा केले.यात संशयिताने तक्रारदाराकडून तब्बल १६ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम गोळा केली; मात्र आपले काम होत नसल्याने आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे गाठून आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार संशयित संदीप गुरव याच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमिषाला बळी पडू नका जर असे आपल्या सोबतही घडले असेल किंवा आपल्याला निदर्शनास येत असेल तर तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. - मनीष कोल्हटकर, प्रभारी अधिकारी, सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस