Vidhan Sabha 2019: माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत पुन्हा स्वगृही; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 08:24 IST2019-09-28T08:19:38+5:302019-09-28T08:24:08+5:30
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत काँग्रेसच्या वाटेवर

Vidhan Sabha 2019: माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत पुन्हा स्वगृही; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश
सावंतवाडी : माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत काँग्रेसच्या वाटेवर असून, रविवारी त्यांचा मुंबई येथे काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्यांच्याकडे राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. दहा वर्षांपूर्वी सावंत यांचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी न पटल्याने त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत बसपामध्ये प्रवेश केला होता, मात्र तेथेही न पटल्याने त्यांनी शिवराज्य पक्षांत प्रवेश करून महाराष्ट्राची धुरा खांद्यावर घेतली होती. पण एक वर्षापूर्वी शिवराज्य पक्षातून सावंत यांनी आपमध्ये प्रवेश केला होता; सध्या ते आपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते, मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर सावंत हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. रविवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत.