शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कालची रात्र जेलमध्ये घालवल्‍यानंतर कशी जिरली कळले असेल, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 13:47 IST

केंद्रीयमंत्री नारायण राणे हे पुत्रप्रेमापोटीच संसद आणि मंत्रीपदाचे काम सोडून कणकवलीत तळ ठोकून बसले

कणकवली:  सिंधुदुर्ग जिल्‍हा बँकेच्या निकालानंतर सोशल मीडियातून माझी बदनामी करण्यात आली. माझी कशी जिरवली याची व्यंगचित्रे काढण्यात आली. पण माझी जिरवताना आमदार नीतेश राणेंचीच कशी जिरली हे त्‍यांना कालची रात्र जेलमध्ये घालवल्‍यानंतर निश्‍चित कळले असेल अशी टीका जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे. 

तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या केंद्रीयमंत्री नारायण राणे हे पुत्रप्रेमापोटीच संसद आणि मंत्रीपदाचे काम सोडून कणकवलीत तळ ठोकून बसले होते असेही ते म्‍हणाले. कणकवली येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  सावंत बोलत होते. 

ते म्‍हणाले, कणकवली विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडून गेलेले आमदार केशवराव राणे, अप्पासाहेब गोगटे यांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिले. कार्यकर्त्यांना भीती दाखविण्यासाठी त्‍यांना कधी दहशतवाद करण्याची आवश्‍यकता भासली नाही. मात्र, आताचे आमदार कार्यकर्त्यांच्या अंगावर जाणे, कार्यकर्त्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे अशा प्रकारची कृत्य करत आहेत.मात्र, त्‍यांची ही कृत्‍ये कणकवलीतील मतदारांना कधीही मान्य होणार नाहीत. लोकहितासाठी हे आमदार कधी जेलमध्ये गेले नाहीत. तर अधिकाऱ्यांवर चिखलफेक, दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यावर हल्‍ला अशा दहशतवाद प्रकरणात त्‍यांना जेलमध्ये जावे लागले आहे.जे नारायण राणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पुत्रप्रेमाचे आरोप करत होते. तेच नारायण राणे स्वत:च्या मुलाला वाचविण्यासाठी केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी टाळून कणकवलीत ठाण मांडून होते. राणे यांनी कितीही दहशतवाद निर्माण केला तर त्‍याला शिवसैनिक घाबरणार नाहीत. शिवसैनिक यापूर्वी कधी राणेंचा दहशतवादाला घाबरले नाहीत आणि यापुढेही दहशतवाद सहन करणार नाहीत. दरम्‍यान, आम्‍ही काहीही केले तरी आमचे कुणी काही वाकडे करू शकत नाही अशी घमेंड आमदार नीतेश राणे यांना होती. पैशाच्या जोरावर काहीही करता येईल अशा भ्रमात ते वावरत होते. मात्र, संतोष परब यांच्यावरील हल्‍ला प्रकरणानंतर त्‍यांची घमेंड निश्‍चितपणे उतरली असेल.न्यायदेवतेपुढे पैसा, दबाव काहीही चालत नाही हे देखील त्‍यांच्या लक्षात आले असेल. पूर्वी मूर्ती लहान पण किर्ती महान असा वाक्‍यप्रयोग वापरात होता. पण आता 'मूर्ती लहान पण अपकिर्ती महान 'असा शब्‍दप्रयोग रूढ होईल असा टोलाही सतीश सावंत यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSatish Sawantसतीश सावंतNitesh Raneनीतेश राणे