मालवणात पाच पर्यटक समुद्रात कोसळले; मुंबईतील दोन कुटुंबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 20:24 IST2020-01-01T20:22:28+5:302020-01-01T20:24:42+5:30
मुंबईतील दोन कुटुंबे पर्यटनासाठी येथे आली होती. जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी दांडी किनाऱ्यावर गेली होती. समुद्रात साहसी जलक्रीडा करत असताना काही अंतरावरून गेलेल्या बोटीमुळे अचानकपणे निर्माण झालेल्या लाटेचा तडाखा या पर्यटकांना बसला. यात दोन मुले, दोन पुरूष आणि एक महिला समुद्राच्या पाण्यात फेकले गेले.

मालवणात पाच पर्यटक समुद्रात कोसळले; मुंबईतील दोन कुटुंबे
मालवण : पर्यटन हंगाम तेजीत आला असताना मालवणात दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. मालवण दांडी किनारपट्टीवर साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटत असताना मोठ्या लाटेत पाच पर्यटक समुद्राच्या पाण्यात फेकले गेल्याची घटना सोमवारी घडली. यात तिघा पर्यटकांची प्रकृती गंभीर बनल्याने खासगी रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा येथे त्यांना हलविण्यात आले.
देवबाग येथे काही दिवसांपूर्वीच बोट दुर्घटना घडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतरही पर्यटकांचे अपघात होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. परिणामी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पर्यटकांची खबरदारी घेण्याबाबत तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मालवण पोलिसांनी बंदर विभागाला पत्र पाठविले आहे.
मुंबईतील दोन कुटुंबे पर्यटनासाठी येथे आली होती. जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी दांडी किनाऱ्यावर गेली होती. समुद्रात साहसी जलक्रीडा करत असताना काही अंतरावरून गेलेल्या बोटीमुळे अचानकपणे निर्माण झालेल्या लाटेचा तडाखा या पर्यटकांना बसला. यात दोन मुले, दोन पुरूष आणि एक महिला समुद्राच्या पाण्यात फेकले गेले.
पर्यटक समुद्रात फेकले गेल्याचे दिसून येताच त्यांनी तत्काळ त्यांना समुद्रातून बाहेर काढत शहरातील खासगी रुग्णालयात हलविले. यात दोन मुलांना दुखापत कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र दोन महिला व एक पुरूष यांची प्रकृती गंभीर बनली. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, तरीही अधिक उपचारासाठी त्या तिघांना गोवा येथे हलविण्यात आले.