मालवण मेढा समुद्रात मासेमारी नौका उलटली, एक मच्छीमार बेपत्ताच; दोन मच्छीमार बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:20 IST2025-07-08T11:19:08+5:302025-07-08T11:20:04+5:30
समुद्रात जोराचा वारा व मोठ्या लाटांच्या तडाक्यात मासेमारी नौका पलटी झाली. या तीनही मच्छीमार समुद्रात फेकले गेले.

मालवण मेढा समुद्रात मासेमारी नौका उलटली, एक मच्छीमार बेपत्ताच; दोन मच्छीमार बचावले
मालवण: शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन तीन मच्छीमार पाण्यात फेकले गेले. यात दोघेजण बचावले असून एक मच्छीमार बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छिमारांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू आहे. ही घटना मंगळवारी (८ जुलै) पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारुती जगताप, महादेव घागरे यांनी भेट देत माहिती घेतली. अपघातातील मासेमारी नौका किनाऱ्यावर आणण्यात आली आहे.
बेपत्ता मच्छिमार कोण?
पोलिसांनी सांगितले की, शहरातील मेढा जोशी वाडा येथील कीर्तीदा लीलाधर तारी (वय २९), सचिन सुभाष केळुसकर (वय ४२), जितेश विजय वाघ (वय ३५) हे तीन मच्छीमार आज सकाळी मेढा राजकोट येथील समुद्रात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते.
दरम्यान, समुद्रात जोराचा वारा व मोठ्या लाटांच्या तडाक्यात मासेमारी नौका पलटी झाली. या तीनही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. या अपघातात कीर्तीदा तारी व सचिन केळुसकर हे सुखरूप किनाऱ्यावर पोहत पोहोचले.