Sindhudurg: मालवण चिवला बीच येथे अज्ञाताने मासेमारी नौका जाळली

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 6, 2023 12:04 IST2023-11-06T12:03:29+5:302023-11-06T12:04:33+5:30

मालवण ( सिंधुदुर्ग ) : मालवण चिवला बीच चौकचार मंदिर पासून काही अंतरावर किनाऱ्यावर उभी करून ठेवलेली आल्बट कामील ...

Fishing boat burnt at Malvan Chiwala Beach | Sindhudurg: मालवण चिवला बीच येथे अज्ञाताने मासेमारी नौका जाळली

Sindhudurg: मालवण चिवला बीच येथे अज्ञाताने मासेमारी नौका जाळली

मालवण (सिंधुदुर्ग) : मालवण चिवला बीच चौकचार मंदिर पासून काही अंतरावर किनाऱ्यावर उभी करून ठेवलेली आल्बट कामील फर्नांडिस यांच्या गिलनेट मासेमारी नौकेला मध्यरात्री अज्ञाताने आग लावल्याची घटना घडली.

आगीत नौका तसेच आतील जाळी जळत असताना परिसरातील स्थानिकांना जाग येताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. आल्बट फर्नांडिस यांना माहिती देण्यात आली. आग आटोक्यात आणण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले मात्र नौका व आतील जाळी जळून गेली. या दरम्यान बाजूला एक नौका उभी होती त्याच्या इंजिनवर असलेल्या कपड्याला काही प्रमाणात आग लागली मात्र स्थानिकांनी ही आग आटोक्यात आणली.

जळालेल्या नौकेच्या बाजूला मातीत कोणीतरी धावत जात असलेल्या स्थितीत मातीत पायाचे ठसे दिसून येत होते. असे मच्छिमार यांनी सांगितले. आग लावून कोणीतरी धावत पळून गेले असावे. या दृष्टीने पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तर आजूबाजूला सिसिटीव्ही फुटेज मिळते का याचीही माहिती घेतली जात होती.

Web Title: Fishing boat burnt at Malvan Chiwala Beach