शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांना सात तास रोखले

By admin | Updated: July 16, 2015 01:07 IST

वाद पर्ससीननेटधारकांचा : निवतीतील मिनी पर्ससीनधारक संघटना आक्रमक

म्हापण : मिनी पर्ससीननेट मच्छिमारांवर संशयास्पद बोटीप्रकरणी झालेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी निवती बंदरात दाखल झालेल्या सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी सुगंधा चव्हाण व त्यांचे सहकारी अधिकारी डोंगळे यांना बुधवारी निवती बंदरावर अडवून सात तास रोखून धरण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दुपारी एक वाजता अधिकाऱ्यांची मच्छिमारांच्या तावडीतून सुटका झाली.निवती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कळसुलकर व हेडकॉन्स्टेबल गिरकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन मिनी पर्ससीनधारक मच्छिमार नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले व वर्तमानपत्रातील वृत्तामध्ये ज्यांनी आक्षेपार्ह विधाने केली आहेत, त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा, तसेच तुमच्या म्हणण्याचे निवेदन मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांना द्या, अशी सूचना केली. त्यानंतर मिनी पर्ससीनधारक संघटनेची बैठक होऊन आपल्या म्हणण्याचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष अशोक सारंग यांनी सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी सुगंधा चव्हाण यांना सादर केल्यावर त्यांची अडवलेली गाडी सोडण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये मिनी पर्ससीन संघटनेचे अध्यक्ष अशोक सारंग, मत्स्य व्यावसायिक श्याम सारंग, कमलेश मेतर, प्रल्हाद मेतर, रामू भगत, आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)बंदर जेटी रस्ता अडविलासकाळी सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी सुगंधा चव्हाण व त्यांचे सहकारी अधिकारी नौकांची तपासणी करण्यासाठी बंदर जेटीकडे गेले. अधिकाऱ्यांची कोंडी करण्यासाठी साडेसातच्या सुमारास मच्छिमारांनी बंदर जेटीकडील रस्त्यावर चिरे आणि लाकडी ओंडके टाकून रस्ता बंद केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रस्ता खुला करण्यात आला.