हातपंप दुरुस्ती कामगारांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:24 PM2019-07-01T13:24:14+5:302019-07-01T13:25:39+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ९ हातपंप दुरुस्ती कामगारांना (मैकेनिकला) जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्याचा निर्णय कामगार न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या ९ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला असून याला आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव ११ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आजच्या जल व्यवस्थापन समिती सभेत देण्यात आली. त्यामुळे या ९ हातपंप दुरुस्ती कामगारांना कायमस्वरूपी दिलासा मिळाला आहे.

To extend hand pump repair workers to Zilla Parishad service | हातपंप दुरुस्ती कामगारांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेणार

हातपंप दुरुस्ती कामगारांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेणार

googlenewsNext
ठळक मुद्देजलव्यवस्थान समिती सभेत माहिती न्यायालयाच्या निर्णयामुळे कामगारांना दिलासा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गजिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ९ हातपंप दुरुस्ती कामगारांना (मैकेनिकला) जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्याचा निर्णय कामगार न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या ९ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला असून याला आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव ११ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आजच्या जल व्यवस्थापन समिती सभेत देण्यात आली. त्यामुळे या ९ हातपंप दुरुस्ती कामगारांना कायमस्वरूपी दिलासा मिळाला आहे.

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरीश जगताप, उपाध्यक्ष रणजीत देसाई, विषय समिती सभापती जेरॉन फर्नांडिस, डॉ. अनीषा दळवी, पल्लवी राऊळ, सदस्य मायकल डिसोजा, उत्तम पांढरे, सावी लोके, सरोज परब, श्वेता कोरगावकर, स्वीकृत सदस्य प्रमोद कामत, विकास कुडाळकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास सावंत, अधिकारी खातेप्रमुख आदि उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९४८ हातपंप आहेत. या हातपंपाची दुरुस्ती गेले अनेक वर्षे ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत कार्यरत असलेल्या हातपंप दुरुस्ती कामगारांमार्फत केली जाते. या कामगारांना कामाच्या प्रमाणात मोबदला दिला जातो. मात्र गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेला सेवा देणाऱ्या या कामगारांनी आपल्याला सेवेत सामावून घेण्यात यावे असे अपील कामगार न्यायालयात केले होते. यावर या हातपंप दुरुस्ती कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावे असे आदेश कामगार न्यायालयाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला दिले आहेत.

Web Title: To extend hand pump repair workers to Zilla Parishad service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.