शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

मालवणात बाळासाहेबांच्या पुतळ्याची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 8:25 PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साधून शिवसेना तालुका कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी शिवसैनिकांनी अर्धपुतळ्याची देवली चौके मार्गे मालवण अशी भव्य ढोलताशांच्या गजरात दुचाकी रॅली काढली.

ठळक मुद्देमालवणात बाळासाहेबांच्या पुतळ्याची स्थापनाजयंतीचे औचित्य : हरी खोबरेकर यांची संकल्पना

सिंधुदुर्ग : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साधून शिवसेना तालुका कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी शिवसैनिकांनी अर्धपुतळ्याची देवली चौके मार्गे मालवण अशी भव्य ढोलताशांच्या गजरात दुचाकी रॅली काढली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणांनी मालवण शहरात भगवी लाट निर्माण झाली होती. आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या उपस्थित काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत शहरात शेकडो शिवसैनिक, महिला सहभागी झाले होते.मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या संकल्पनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण तालुका शाखेत प्रथमच बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला.

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मंदार गावडे, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, महेंद्र म्हाडगूत, राजू परब, महेश शिरपुटे, किसन मांजरेकर, रवी तळाशीलकर, सेजल परब, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, दीपा शिंदे, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, नंदू गवंडे, गौरव वेर्लेकर, आतू फर्नांडिस, चंदू खोबरेकर, यशवंत गावकर यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.देवली येथील मूर्तिकार कमलेश चव्हाण यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धपुतळा साकारला. भव्य दुचाकी रॅली आणि ढोलताशांच्या गजरात देवली, चौके मार्गे मालवण असा पुतळा जल्लोषपूर्ण वातावरणात आणण्यात आला. मालवण शहरात शिवसेना शाखा-भरड-बाजारपेठ-फोवकांडा पिंपळ ते शाखा अशी अभिवादन रॅली काढण्यात आली. त्यानंतर पुतळ्याचे तालुका कार्यलयात पूजन करून स्थापना करण्यात आली.गजर बाळासाहेबांचा विशेष संगीत भजनस्पर्धायावेळी मूर्तिकार चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना शाखा येथे बुधवारी दुपारी महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर सायंकाळी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी ह्यगजर बाळासाहेबांचाह्ण या विशेष संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग