शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींच्या कळपाचा धुडगूस

By admin | Updated: November 20, 2014 00:02 IST

कणकवली तालुक्यात वावर : पिसेकामते, बिडवाडीत शेतीचे नुकसान

कणकवली : मंगळवारी रात्रीपासून जंगली हत्तींच्या कळपाने पिसेकामते, बिडवाडी, तरंदळे परिसरात बागायतीचे नुकसान केले. जंगली हत्तींच्या वावराने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बुधवारी सायंकाळपासून तरंदळे धरण परिसरात आढळलेल्या या हत्तींना हुसकावून लावण्याचे प्रयत्न वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहेत. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पिसेकामते कदमवाडीतील माजी उपसरपंच विलास कदम यांच्या पत्नीला आवाज आल्याने त्या घराबाहेर आल्या. तेव्हा बॅटरीच्या प्रकाशात त्यांना हत्ती दिसले आणि त्यांनी ओरड मारली. थोड्याच वेळात पूर्ण वाडीत ही वार्ता पसरली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही कळविण्यात आले. रात्रीपासून शोधाशोधपिसेकामते परिसरात हत्ती आल्याचे वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे पथक दाखल झाले. वनपाल नाना तावडे यांच्यासह वनरक्षक उत्तम कांबळे, सारिक फकीर, दत्तगुरू पिळणकर, सूरज बाबूल, एस.ए.मणेर, मधु सावंत, म.ल.गुडेकर आदींच्या पथकाने हत्तींच्या शोधार्थ मोहीम राबवली. मात्र, हत्तींचे थेट दर्शन झाले नाही. रात्री ३.३० वाजेपर्यंत ही शोधमोहिम सुरू ठेवण्यात आली होती. हत्तींच्या पावलांच्या ठशांवरून आणि बागायतीच्या नुकसानीवरून बुधवारी सकाळी पुन्हा पिसेकामते येथील जंगलमय भागात वनविभागाकडून शोधमोहिम राबविण्यात आली. तेव्हा बिडवाडी आणि नंतर तरंदळे धरण परिसरात हत्तींचा वावर असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. तरंदळे परिसरात दोन हत्ती वनविभागाच्या पथकाला दिसले. (प्रतिनिधी)यापूर्वी दोनवेळा आगमन कणकवली तालुक्यात हत्तींचा प्रवेश दोन वर्षांपूर्वी एकदा आणि त्यामागील वर्षी असा दोन वेळा झाला होता. त्यावेळीही हत्तींनी परिसरातील बागायतीचे नुकसान केले होते. थंडीच्या मोसमात हत्तींचे आगमन होत असल्याचे दिसून आले आहे.माडबागायतीचे नुकसान कदमवाडीतील सुभाष परूळेकर यांच्या केळी, पोफळी, माडाचे हत्तींनी नुकसान केले. शैलेश डिचोलकर यांचे सात माड मोडून टाकले. उपसरपंच विलास कदम यांचे दोन माड मोडले. अनंत तळवणेकर यांचा गडगा तोडून टाकला. अपर्णा सावंत यांच्या केळीही हत्तींनी मोडून टाकल्या. तरंदळे दाभळवाडीतील पंढरीनाथ कदम यांच्या केळी व माडांचे नुकसान हत्तींनी केले आहे. वनविभागाकडून या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे. तसेच ग्रामस्थांनी सायंकाळनंतर घराबाहेर पडू नये, असे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. तीन पथके या हत्तींना पुन्हा आल्यामार्गे हुसकावण्यासाठी वनविभागाची तीन पथके करण्यात आली. एक हुंबरणे येथून, एक तरंदळे येथून आणि त्यामध्ये एक अशी तीन पथके या हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.दोन जंगली हत्ती पिसेकामतेत दाखल झालेल्या या हत्तींची संख्या दोन असल्याचे वनपाल नाना तावडे यांनी सांगितले. माणगांव खोऱ्यात वास्तव्यास असलेले हे हत्ती पुढे कसालमार्गे पुढे आले असावेत. गडनदी पोहून पलिकडे आले असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. पिसेकामते परिसरात रात्री पाच हत्ती असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत होती.