चिपी विमानतळासाठी मालवणातून भूमिगत वीज पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 13:53 IST2018-11-20T13:46:40+5:302018-11-20T13:53:10+5:30
चिपी विमानतळासाठी मालवण कुंभारमाठ आणि वेंगुर्ले येथून वीज पुरवठा करण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी मालवण कुंभारमाठ ते चिपी विमानतळ अशा भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जाणार आहेत.

चिपी विमानतळासाठी मालवणातून भूमिगत वीज पुरवठा
कणकवली - चिपी विमानतळासाठी मालवण कुंभारमाठ आणि वेंगुर्ले येथून वीज पुरवठा करण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी मालवण कुंभारमाठ ते चिपी विमानतळ अशा भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. 95 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
येत्या सात दिवसांत हा प्रस्ताव आरआरबी कंपनीकडे पाठविणार आहेत. त्याकंपनीकडून निधी प्राप्त होताच भूमीगत वीज वाहिन्यांच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी मंगळवारी (20 नोव्हेंबर) दिली. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन महावितरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.