भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड

By सुधीर राणे | Updated: May 3, 2023 16:26 IST2023-05-03T15:54:24+5:302023-05-03T16:26:23+5:30

काळसेकर यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव

Election of Atul Kalsekar as BJP State Vice President | भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड

भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. 

कणकवली तेलीआळी येथील मूळ रहिवासी असलेल्या अतुल सुधाकर काळसेकर यांनी  भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे  पेलली होती. त्यानंतर लोकसभा प्रवास योजनेच्या प्रमुख पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती. आता पुन्हा प्रदेश भाजपा उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवल्याने एकप्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

अतुल काळसेकर यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांची देखील प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपुत्रांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Web Title: Election of Atul Kalsekar as BJP State Vice President