शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील आठ प्रस्ताव प्रलंबित

By admin | Updated: August 26, 2015 22:46 IST

फलोत्पादन विकास अभियान : शेततळ्यांची मान्यता रखडली

रत्नागिरी : राष्ट्रीय फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने शेततळ्यांची मान्यता थांबवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठ शेततळ्यांचे प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत. शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही शेततळ्यांचे प्रस्ताव प्रलंबित राहिल्याचे दिसत आहे.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबवत असताना शेततळी बांधण्यास शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाकडून शंभर टक्के अनुदान देण्यात येते. शेतामध्ये किंवा बागायतीमध्ये ठराविक आकाराचे चौकोनी खड्डे काढून त्यामध्ये विशिष्ट व्यास जाडीचे प्लास्टिक आच्छादन करण्यात येते. त्यामध्ये पावसाचे पाणी साठवले जाते. संबंधित साठवलेल्या पाण्यावर उन्हाळी शेती किंवा बागायती फुलविली जाते. रत्नागिरी जिल्हा भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यात वसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. २००५ पासून २०१४ पर्यंत जिल्ह्यात एकूण ८१ सामूहिक शेततळी बांधण्यात आली आहेत. त्यासाठी १ कोटी ९२ लाख ९७ हजार रूपये अनुदान वितरीत करण्यात आले. २०१५मध्ये ५ शेततळी बांधण्यात आली. त्यासाठी ९ लाख २३ हजाराचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले. २०१५-१६साठी ८ सामूहिक शेततळ्यांचे प्रस्ताव मान्यतेअभावी प्रलंबित राहिले आहेत.सामूहिक शेतीसाठी शेततळ्यांचा वापर शक्य होऊ लागला आहे. सध्या बचत गटांच्या माध्यमातून सामूहिक शेतीकडे कल अधिक आहे. भात पिकानंतर हिवाळी व उन्हाळी शेती पिकविली जाते. कलिंगड, वेलवर्गीय भाज्या, फुलांची शेती करण्यात येते. हिवाळ्यात व उन्हाळ्यात शेततळ्यातील पाण्याचा वापर करता येतो. शेततळ्यासाठी शासनाकडून १०० टक्के अनुदान देण्यात येते. ६८ हजारापासून दहा लाखापर्यंत शेततळ्यांसाठी अनुदान देण्यात येत असल्यामुळे शेतकरी आवश्यक त्या आकाराचे शेततळे शेतात तयार करीत आहेत. या योजनेंतर्गंत अनेक शेतकरी शेततळी तयार करून शासनाच्या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत. मात्र, शेततळ्यांची मान्यताच थांबविल्याने नाराजी व्यक्त होत आहे.कोकणात शेततळ्यांमुळे कातळावरही बागायती फुलविण्यात आली आहे. शिवाय बारमाही शेती देखील शक्य होत आहे. शेतकऱ्यांसाठी सामूहिक शेततळे फायदेशीर असल्यामुळे संबंधित योजनेस पुन्हा मान्यता मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रीय फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाकडून शंभर टक्के अनुदान.जिल्ह्यात एकूण ८१ सामूहिक शेततळ्यांचे बांधकाम.६८ हजारांपासून दहा लाखांपर्यंत शेततळ्यांसाठी अनुदान.कोकणातील कातळावरही बागायती फुलल्या.सामूहिक शेततळे फायदेशीर असल्याने मान्यता मिळण्याची मागणी.