शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

डिचा पक्षी नदी-ओढ्यांवर शिकार शोधण्यात गर्क, अनोखा मच्छिमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 3:18 PM

ज्याच्या शासनाकडे कोणत्याही मागण्या नाहीत अथवा मत्स्य दुष्काळाची भीतीही त्याला कधी शिवत नाही, असा एक अनोखा मच्छिमार सध्या मच्छिमारीचा आपला धर्म नित्यनियमाने पाळत आहे. हा आहे एक सामान्य पक्षी डिचा. हा नेत्रसुखद पक्षी कोकणातील नदी-ओढ्यांवर शिकार शोधण्यात गर्क झालेला दिसून येत आहे.

ठळक मुद्दे डिचा पक्षी नदी-ओढ्यांवर शिकार शोधण्यात गर्क, अनोखा मच्छिमारना शासनाकडे मागण्या, ना मत्स्यदुष्काळाची भीती

सुरेश बागवे

कडावल (सिंधुदुर्ग) : ज्याच्या शासनाकडे कोणत्याही मागण्या नाहीत अथवा मत्स्य दुष्काळाची भीतीही त्याला कधी शिवत नाही, असा एक अनोखा मच्छिमार सध्या मच्छिमारीचा आपला धर्म नित्यनियमाने पाळत आहे. हा आहे एक सामान्य पक्षी डिचा. हा नेत्रसुखद पक्षी कोकणातील नदी-ओढ्यांवर शिकार शोधण्यात गर्क झालेला दिसून येत आहे.पाठ आणि पंखांवर गडद निळा रंग, त्यावर क्वचित हिरव्या छटा, एखाद्या समर्थ चित्रकाराने आपल्या कुशल हातांनी कुंचल्याचा फटकारा अलगद पण अचूक मारावा आणि कुंचल्याचा तो एकच स्ट्रोक समीक्षकांच्याही कौतुकाचा विषय ठरावा, तसा पाणीदार.

डोळ््यांसमोर तरंगणारा लाल-गुलाबी रंग, करडी चोच, पोटाकडील भाग किंचित पिवळसर आणि त्यावर निसर्गाने सौम्य लाल रंगाचा मारलेला स्प्रे आणि तेज गतीने आपल्या भक्ष्याच्या दिशेने अचूक सूर मारण्याचे अंगभूत कौशल्य लाभलेला हा पक्षी सरव्हायव्हर आॅफ फिटेस्टच्या जगात अद्यापही आपले अस्तित्व टिकवून आहे.

पक्षीतज्ज्ञांच्या जगातील सर्वांगसुंदर असा हा ह्यकिंगफिशरह्ण कोकणात मात्र डिचा या काहीशा अडगळीच्या व हास्यास्पद नावाने ओळखला जातो. त्याच्या करड्या रंगाच्या अवाजवी लांबीच्या चोचीमुळेच बहुधा त्याला हे नाव मिळाले असावे. लांब नाकाच्या व्यक्तीला कोकणात डिचो म्हणून हिणविले जाते, ते या पक्ष्याच्या जातकुळीवरूनच. मात्र, याच लांब चोचीचा उपयोग त्याला हवेतून सूर मारून पाण्यातील मासा सहजरित्या पकडण्यासाठी होतो.आचारसंहितेत कधीही खंड पडत नाहीओढे किंवा नदीकाठ ही या पक्ष्याची कर्मभूमी. तेथे शेरणीच्या फांदीवर मस्त झुलत बसावे आणि जवळपास एखादा मासा फिरकला की, डोळ््याचे पाते लवते न लवते अशा तेजतर्रार वेगात सूर मारून त्याला आपल्या लांब-भक्कम चोचीने अलगद टिपून मग पुन्हा त्याच शेरणीच्या फांदीवर बसून आपले उदरभरण करावे, ही या पक्ष्याची जणू आजीवन आचारसंहिता बनली आहे. एकदा का पंख फुटून उडता येऊ लागले की, त्याच्या या आचारसंहितेत कधीही खंड पडत नाही.नदीनाले, ओहोळ परिसरात वास्तव्यकोकणातील बहुतेक नदीनाले, ओहोळ किंवा कोंडींवर या नितांतसुंदर पक्ष्याचे दर्शन सध्या होत आहे. पाण्यातील लहानसहान मासे डिचाचे आवडते खाद्य असून, अनेकदा हे मासे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येणारे किडे खाण्यासाठी पाण्याच्या लहान प्रवाहाकडे धावतात आणि मग ओढ्याकाठच्या झाडीझुडपात दबा धरून बसलेल्या डिचाचे काम अधिकच सोपे होऊन जाते. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्ग