शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
4
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
5
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
7
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
8
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
9
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
10
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
11
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
12
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
13
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
14
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
15
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
16
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
17
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
18
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
19
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
20
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

शिरंगे धरणग्रस्तांची पाण्यासाठी वणवण, तीन वर्षांपासूनची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 10:38 AM

महाराष्ट्र  आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे धरणग्रस्तांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनींचा त्याग केला. त्याच धरणग्रस्तांवर पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शिरंगे पुनर्वसन गावठणात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. २५

ठळक मुद्दे शिरंगे धरणग्रस्तांची पाण्यासाठी वणवण, तीन वर्षांपासूनची व्यथा पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ

दोडामार्ग : महाराष्ट्र  आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे धरणग्रस्तांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनींचा त्याग केला. त्याच धरणग्रस्तांवर पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शिरंगे पुनर्वसन गावठणात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

२५ लाख रुपये खर्चून राष्ट्रीय  पेयजलमधून विहिर व पंपहाऊस बसविण्यात आला खरा, मात्र पाईप लाईन टाकण्यासाठी निधीच नाही अशा अवस्थेत गेल्या तीन वर्षापासून शिरंगे धरणग्रस्त पाण्यासाठी वणवण फिरत आहेत.महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारी धरण साकारले आहे. या धरणासाठी ग्रामस्थांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनींचा त्याग केला. घरादारावर पाणी सोडले, या धरणग्रस्तांचे पुनर्वसन खानयाळे येथे करण्यात आले. मात्र, ज्यांनी धरणासाठी सर्वस्वाचा त्याग केला, त्याच धरणग्रस्तांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात ही परिस्थिती निर्माण होते. मात्र प्रशासन आणि जनतेचे कैवारी म्हणवणारे राजकीय पुढाऱ्यांनी मात्र त्याकडे कानाडोळा केला आहे.शिरंगे पुनर्वसन गावची लोकसंख्या जेमतेम ५०० च्या आसपास आहे. या ठिकाणी पुनर्वसन झाल्यावर पुनर्वसन विभागाने गावठाणचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण केले आणि बोडण ग्रामपंचायत अस्तित्वात आली. सण २०१६-१७ मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी राष्ट्रीय पेयजलमधून २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र पाईपलाईन टाकण्यासाठी निधिच नसल्याने नळयोजनेचे काम रखडले. परिणामी गेल्या तीन वर्षांपासून शिरंगे पुनर्वसनवासियांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.विहिरींनी गाठला पाण्याचा तळसध्या पूनर्वसन गावठणात तीन विहिरी आहेत. त्यापैकी दोन विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. जेमतेम आठ दिवस पुरेल एवढेच पाणी त्यात शिल्लक आहे. तर राष्ट्रीय  पेयजलच्या विहिरीत पाणी मुबलक आहे. मात्र तीन वर्षांपासून त्यातील पाणी उपसा व गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही. अशा परिस्थितीत शिरंगे धरणगस्तांची व्यथा दूर करण्याचे सोयरसुतक कोणालाच नाही. ही शोकांतिका म्हणावी लागेल. ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या त्यांच्यावरच पाण्यासाठी दारोदारी फिरावे लागत असल्याने धरणग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीशिरंगे पुनर्वसन गावठणात गेल्या तीन वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या आहे. मात्र ती दूर करण्याच्यादृष्टीने कोणतीच पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. परीणामी चालू वर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी धरणग्रस्तांमधून केली जात आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईsindhudurgसिंधुदुर्ग