शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारींकडून नगराध्यक्षांचा खुर्चीचा अवमान, सावंतवाडीतील नगरपालिकेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 15:01 IST

सावंतवाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर प्रभारी नगराध्यक्षा म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षांची खुर्ची तेथून हलवून इतरत्र ठेवली असा आरोप सावंतवाडी नगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी केला आहे.

ठळक मुद्दे प्रभारींकडून नगराध्यक्षांचा खुर्चीचा अवमान, सावंतवाडीतील नगरपालिकेतील प्रकारशिवसेनेच्या नगरसेवकांकडून घटनेचा निषेध

सावंतवाडी: सावंतवाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर प्रभारी नगराध्यक्षा म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षांची खुर्ची तेथून हलवून इतरत्र ठेवली असा आरोप सावंतवाडी नगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी केला आहे.

जोपर्यत नगराध्यक्षांची खुर्ची आहे. त्या जागेवर ठेवली जात नाही तोपर्यत आम्ही नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये पाय ठेवणार नाही. असा इशारा लोबो यांनी दिला आहे. तसेच याबाबत आम्ही मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचीही भेट घेणार असल्याचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी स्पष्ट केले आहे.सावंतवाडीच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी शनिवारी येथील पालिका सभागृहात विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका भारती मोरे, शुभागी सुकी आदी उपस्थित होते.नगरसेविका लोबो म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने बहुतांशी विकास कामांबाबत कोणतीही माहिती घेतली नव्हती. मात्र गेले दोन दिवस आम्ही सर्व विकासकामांची माहिती घेत असून, अनेक कामे प्रगती पथावर आहेत. असे यावेळी सांगितले. तसेच संत गाडगेबाबा भाजी मंडईचे कामही लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

निवडणूक कधीही होऊ दे पण आम्ही सावंतवाडीवासियांना विकासाचे दिलेले आश्वासन पूर्ण करणार असल्याचे लोबो यांनी सांगितले. तर सावंतवाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रभारी नगराध्यक्षा म्हणून उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर या काम करत आहेत. त्यांना आमचा अजिबात विरोध नाही. पण त्यानी काम करत असताना काही मूल्याची जपणूक करणे बंधनकारक आहे. त्यांनी नगराध्यक्षांची जी खुर्ची होती ती काढून टाकणे योग्य नाही.

आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही त्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची लावून काम करा पण त्यांनी तसे न करता ती खुर्ची बाजूला केली हे कितपत योग्य आहे. मी स्वत: तसेच प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी यांनीही त्यांना कल्पना दिली होती. असे असताना त्यांनी तो मान राखला नाही. असा आरोप लोबो यांनी केला.दोन खुर्च्यांमुळे फोन घ्यायला अडथळा होत होता : कोरगावकरनगराध्यक्षांच्या खुर्चीचा कोणताही अवमान केला नाही. फक्त नगराध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची लावल्यामुळे मला फोन घेता येत नव्हता. तसेच बेल मारता येत नव्हती. यामुळेच ती खुर्ची बाजूच्या केबिनमध्ये ठेवली आहे. त्याचे एवढे राजकारण होईल, असे मला वाटले नव्हते. असे मत प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग