गस्तीनौकेला खोल समुद्रात आढळले दिशादर्शक बोया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 13:10 IST2020-01-24T13:08:57+5:302020-01-24T13:10:09+5:30
सागरी पोलीस दलाच्या गस्तीनौकेला खोल समुद्रात १२ वावामध्ये दिशादर्शक बोया सापडले. देवगडमध्ये खोल समुद्रात गस्त घालताना सागरी पोलीस दलाच्या हर हर महादेव या गस्तीनौकेला १२ वावांमध्ये दिशादर्शक बोया तरंगताना दिसले. गस्तीनौकेवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी बोया देवगड बंदरात आणले आहे.

गस्तीनौकेला समुद्रात दिशादर्शक बोया आढळून आले.
ठळक मुद्देगस्तीनौकेला खोल समुद्रात आढळले दिशादर्शक बोया अपघात होऊ नये याची दक्षता, बोया देवगड आणले बंदरात
देवगड : सागरी पोलीस दलाच्या गस्तीनौकेला खोल समुद्रात १२ वावामध्ये दिशादर्शक बोया सापडले. देवगडमध्ये खोल समुद्रात गस्त घालताना सागरी पोलीस दलाच्या हर हर महादेव या गस्तीनौकेला १२ वावांमध्ये दिशादर्शक बोया तरंगताना दिसले. गस्तीनौकेवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी बोया देवगड बंदरात आणले आहे.
समुद्रात सापडलेले दिशादर्शक बोया हे तुटून आले असून रात्रीच्या वेळी या बोयामुळे नौकांना अपघात होऊ नये याची दक्षता घेऊन गस्तीनौकेवरील कर्मचाऱ्यांनी ते देवगड बंदरात आणले आहे, अशी माहिती सागर पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे यांनी दिली.