पद्मविभूषण देताना कृषीक्षेत्रात काम केले नाही हे कळले नाही का, सुप्रिया सुळेंचा मोदींना टोला

By अनंत खं.जाधव | Published: October 27, 2023 05:20 PM2023-10-27T17:20:34+5:302023-10-27T17:20:55+5:30

सावंतवाडी : एरव्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला नॅशनल करप पार्टी म्हणून हिणवणारया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथील सभेत ...

Didn you know that you didn't work in the agriculture sector when you were awarded the Padma Vibhushan, Supriya Sule challenge to Modi | पद्मविभूषण देताना कृषीक्षेत्रात काम केले नाही हे कळले नाही का, सुप्रिया सुळेंचा मोदींना टोला

पद्मविभूषण देताना कृषीक्षेत्रात काम केले नाही हे कळले नाही का, सुप्रिया सुळेंचा मोदींना टोला

सावंतवाडी : एरव्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला नॅशनल करप पार्टी म्हणून हिणवणारया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथील सभेत भ्रष्टाचारावर एक शब्द बोलले नाही याचा अर्थ आता जनतेनेच घ्यावा. भाजपच्या वॉशिग मशीनची ही किमया आहे का? आता शोधावे लागेल असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. तसेच पद्मविभूषण देताना शरद पवार यांनी कृषीक्षेत्रात काम केले नाही हे कळले नव्हते का? असाही टोला लगावला.

खासदार सुप्रिया सुळे आज, शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी सावंतवाडीत महाविकास आघाडीची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी मंत्री प्रविण भोसले, अर्चना घारे-परब, विकास सावं,त दिलीप नार्वेकर, शेखर माने, पुढलिंक दळवी उपस्थित होते.

सदावर्तेंच्या गाडीवरील हल्ला हा त्याचेच द्योतक 

खासदार सुळे म्हणाल्या, मी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जातो तेथे गृहखात्याबाबत अनेक प्रश्न येतात. गृहखाते अपयशी ठरले आहे. हे खोके सरकार असून त्यांना सामान्य जनतेचे काही पडले नाही त्यामुळेच गृहखात्याचे अपयश पुढे येत आहे. गुणवंत सदावर्ते याच्या गाडीवर झालेला हल्ला हा त्याचेच द्योतक आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली.

'या' पुड्या कोण सडतो माहीत नाही 

आपल्या विरोधात बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार उभ्या राहाणार अशी चर्चा सुरू आहे. यावर त्यांनी या पुड्या कोण सडतो माहित नाही. पण लोकशाहीत कोणी उभे राहावे आणि कोणी राहू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असून मी मात्र बारामती मतदारसंघातून उभी राहणार अशी घोषणाच त्यांनी यावेळी केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही त्यांनी सरकारवर टिका केली. यांना फक्त पक्ष फोडण्यात रस आहे. पण जनतेला न्याय देण्यात हे कमी पडत आहेत. याच्या मागे अदृश्य शक्ती काम करत असून ही शक्ती दिल्लीतील असल्यानेच त्यांना महाराष्ट्राला वरचढ होऊ द्याचे नाही. ही अदृश्य शक्ती कोण हे मला माहित नाही. त्याचा मी शोध घेत असल्याचेही त्या म्हणाल्या.

दीपक मधील द घेतला तरी बरे

शरद पवार यांचा आदर्श घेतल्याचे येथील आमदार दीपक केसरकर सांगतात पण मी म्हणेन त्यांनी दिपक मधील द एवढा जरी आदर्श पवारांकडून घेतला तरी तो बरा असे म्हणत मंत्री केसरकर याची फिरकी घेतली. तसेच मी खोके सरकार म्हटले तर मंत्री केसरकर यांना का राग यावा आणि कोणी संपत्ती विकून राजकारण करतो याचे मला माहित नाही. मी कुणाच्या घरात जात नाही असा निशाणा सुळे यांनी नाव घेता केसरकरांवर साधला.

Web Title: Didn you know that you didn't work in the agriculture sector when you were awarded the Padma Vibhushan, Supriya Sule challenge to Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.