मनसेकडून सहा महिन्यानंतर नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर; धीरज परब, अनिल केसरकर नवे जिल्हाध्यक्ष
By अनंत खं.जाधव | Updated: November 25, 2023 18:13 IST2023-11-25T18:12:48+5:302023-11-25T18:13:52+5:30
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज परब यांना तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी ॲड. अनिल केसरकर ...

मनसेकडून सहा महिन्यानंतर नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर; धीरज परब, अनिल केसरकर नवे जिल्हाध्यक्ष
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज परब यांना तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी ॲड. अनिल केसरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. मनसेने नव्या कार्यकारणीला एक वर्षाची मुदत दिली आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहा महिन्यानंतर नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे.
यात महिला कुडाळ विधानसभा महिला जिल्हाध्यक्षपदी मोनिका फर्नांडिस, जिल्हा सचिवपदी बाळा पावसकर, सावंतवाडी दोडामार्ग उपजिल्हाध्यक्षपदी सुधीर राऊळ, वेंगुर्ला कुडाळ उपजिल्हा अध्यक्षपदी कुणाल किनळेकर, मालवण- कणकवली उपजिल्हाध्यक्षपदी गणेश वाईरकर तर देवगड- वैभववाडीची जबाबदारी चंदन मेस्त्री यांच्याकडे देण्यात आली आहे.
याबाबतचे पत्र नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, वेळोवेळी पक्षाची केलेली कामे आणि संघटना वाढवण्याचे काम लक्षात घेता तुमच्याकडे हे पद देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात दृष्टीने काम करावे. कोणतीही कुचराई झाल्यास तडजोड स्वीकारली जाणार नाही. आपल्या सहकार्याकडून समाजाला कोणताही उपद्रव होणार नाही. अशा प्रकारचे आपले वर्तन असावे हीच अपेक्षा आहे. असे पत्र खुद्द राज ठाकरे यांनी त्यांना दिले आहे.