देव्हारे पर्यटन विकासाच्या प्रतिक्षेतच

By Admin | Updated: February 2, 2015 00:04 IST2015-02-01T21:12:02+5:302015-02-02T00:04:34+5:30

शासनाचे दुर्लक्ष : स्वयंभू शिवमंदिराला ‘क’ दर्जा पण...

Devhare await tourism development | देव्हारे पर्यटन विकासाच्या प्रतिक्षेतच

देव्हारे पर्यटन विकासाच्या प्रतिक्षेतच

देव्हारे : येथील स्वयंभू शिवमंदिराला शासनाच्या पर्यटन विभागाकडून ‘क’ दर्जा मिळूनही हा भाग पर्यटन विकासापासून अद्याप उपेक्षितच राहिला आहे. मात्र, या मंदिराच्या सुशोभिकरणाकडे लक्ष देण्यात येत नसल्याने भाविक नाराज झाले आहे. देव्हारे येथे रस्त्यालगत रहाटीमध्ये शंकराचे मंदिर आहे़ येथे दरवर्षी भाविक येत असतात़ हे मंदिर देवरहाटीमधे आहे़ आजूबाजूला असलेले विस्तीर्ण जंगल,त्यामध्ये असलेली झाडी जुनी आहे. काही झाडांना झोपाळयाचा तर काही झाडांना कमानीचा आकार आलेला आहे़ त्यामुळे, या ठिकाणी फिरताना एक वेगळाच अनुभव येत असतो़ स्वयंभू अशा शंकर मंदिरात महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी असते दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक उत्साहाने येथे येत असतात. त्यामुळे, या मंदिराच्या सुशोभिकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या मंदिराच्या शेजारी व आजूबाजूच्या परिसरामध्ये पुरातन शिळा आढळून आल्या आहेत. आज त्या मंदिराबाहेर व काही झाडांच्याजवळ ठेवल्या गेल्या आहेत़ परिसरातील जाणकारांच्या मते, सदर शिला या राजा शालिवाहन याच्या कार्यकाळातील असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.़ तसेच देव्हारे पासून काही अंतरावर नदीच्या ठिकाणीही अनेक सुंदर शिळा जंगलामधे आढळून आल्या आहेत़ याबाबत योग्य माहिती नसल्याने, ग्रामिण भागातील नागरिकांनी इतिहासाची साक्ष ठरणाऱ्या या शिळांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. मंदिर परिसराचे सुशोभिकरण झाल्यास पर्यटकांची ये-जा वाढेल व त्यातून या भागाचा विकास होण्यास मदत होईल. (वार्ताहर)

Web Title: Devhare await tourism development