शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

अज्ञाताकडून कणकवली पर्यटन सुविधा केंद्राची तोडफोड, साहित्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 1:23 PM

कोविड काळात या पर्यटन सुविधा केंद्रामध्ये कणकवली नगरपंचायतने अद्यायावत असे कोविड केअर सेंटर सुरू केले होते. त्याचा फायदा अनेक रुग्णांना झाला होता.

कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या मुडेश्वर मैदानाजवळील पर्यटन सुविधा केंद्राच्या एका खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञाताने आतील साहित्याची नासधूस केली. हा प्रकार आज, बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. अज्ञात समाजकंटकांकडून हा प्रकार करत असताना या खोलीतील गाद्या व बेडचे नुकसान करण्यात आले आहे. मात्र या खोलीतील काहीही साहित्य चोरीस गेले नसल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

अज्ञातांकडून पर्यटन सुविधा केंद्राच्या मुख्य दरवाज्याचेही कुलूप दगडाद्वारे फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पर्यटन सुविधा केंद्रामध्ये कणकवली नगरपंचायतने अद्यायावत असे कोविड केअर सेंटर सुरू केले होते. त्याचा फायदा अनेक रुग्णांना झाला होता. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर ते बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा कोविडच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर  नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून या पर्यटन सुविधा केंद्रातील कोविड केअर सेंटरची साफसफाई करण्याच्या सूचना नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या.त्यामुळे या कोविड केअर सेंटरची साफसफाई करण्यात करीता कर्मचारी गेले असता तेथे हा प्रकार उघडकीस आला. मात्र, नगरपंचायतीच्या पर्यटन सुविधा केंद्राची अशी तोडफोड करण्यामागे नेमका उद्देश काय? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात  आहे. तसेच पोलिसांनी संबंधित समाजकंटकांचा शोध घेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, कारवाईच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या पर्यटन सुविधा केंद्राच्या इमारतीत रुग्णांच्या सोयीसुविधांसाठी ठेवण्यात आलेले अनेक साहित्य आहे. मात्र, मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करूनही ते कुलूप फुटले नसल्याने चोरीचा प्रयत्न फसला. त्यामुळे हा प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीtourismपर्यटन