कालव्याचे पाणी विलवडे गेटमधून तेरेखोल नदीत सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 08:28 PM2019-05-29T20:28:21+5:302019-05-29T20:29:42+5:30

विलवडे गावची अर्थव्यवस्था ही पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. परंतु, चालू वर्षी पाऊस लांबल्याने व नदीपात्र कोरडे झाल्याने शेती पिकांसाठी नळ योजनेच्या पंपांना तसेच शेती पंपांना पुरेसे पाणी मिळत नाही. विलवडे परिसरातील शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकंटाला सामोरे जावे लागत आहे.

The demand for the release of canal water from the Willavade Gate to Terekhol river | कालव्याचे पाणी विलवडे गेटमधून तेरेखोल नदीत सोडण्याची मागणी

विलवडे येथील तेरेखोल नदीचे पात्र कोरडे पडले आहे. (छाया : अजित दळवी)

Next
ठळक मुद्देकालव्याचे पाणी विलवडे गेटमधून तेरेखोल नदीत सोडण्याची मागणीतेरेखोल नदीचे पात्र पडले कोरडे

बांदा : विलवडे गावची अर्थव्यवस्था ही पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. परंतु, चालू वर्षी पाऊस लांबल्याने व नदीपात्र कोरडे झाल्याने शेती पिकांसाठी नळ योजनेच्या पंपांना तसेच शेती पंपांना पुरेसे पाणी मिळत नाही. विलवडे परिसरातील शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकंटाला सामोरे जावे लागत आहे.

पाणीटंचाई सदृश स्थिती लक्षात घेऊन तिलारी प्रकल्पाच्या बांदा शाखा कालव्याचे पाणी विलवडे येथील गेटमधून तेरेखोल नदीत सोडावे अशी मागणी विलवडे परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी मंगळवारी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रमोद दळवी यांनी दिले. तिलारी कालव्याचे पाणी तेरेखोल नदीत सोडल्याने विलवडे परिसरातील शेतकºयांना शेती, नळ योजनेस फायदा होईल.

पत्रकात असे नमूद केले आहे की, विलवडे येथून तिलारी प्रकल्पाचा बांदा उपशाखा कालवा गेलेला असून या कालव्याचे काम वाफोली, विलवडे, सरमळे गावात पूर्ण झालेले आहे. ओटवणे येथील कालव्याचे काम चालू असून कालव्याचे पाणी ओटवणे येथील सुक्या नाल्यात सोडण्यात आलेले आहे. या पाण्याचा शेतकºयांना व नळधारकांना, कोणताही फायदा नाही.

विलवडे येथे एप्रिल मे महिन्यामध्ये भेंडी, दोडकी, वाल ,केळी, कणग्या, काकडी विविध प्रकारची नगदी पिके व्यापारी पद्धतीने उत्पादन घेतले जाते. परंतु चालू वर्षी पाऊस लांबल्याने व नदीपात्र कोरडे झाल्याने शेती पिकांसाठी नळ योजनेच्या पंपांना तसेच शेती पंपांना पुरेसे पाणी मिळत नाही. विलवडे, सरमळे, ओटवणे तीनही गावातून गेलेल्या तिलारी कालव्याचे पाणी तेरेखोल नदीत सोडण्यासाठी विलवडे येथे गेट ठेवण्यात आलेले आहे.

 

Web Title: The demand for the release of canal water from the Willavade Gate to Terekhol river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.