"भाजपाचे मंत्री ठाण मांडून बसतात, मग शिवसेनेचे का बसले नाहीत?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 20:56 IST2022-01-03T20:55:42+5:302022-01-03T20:56:02+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत झालेल्या पराभवाचे आम्ही नक्की आत्मचिंतन करूच पण केंद्रीय मंत्री नारायण राणे जर जिल्ह्यात ठाण मांडूनही भाजप अधिकची कुमक पाठवत असेल तर प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमचे ही मंत्री ठाण मांडून राहिले पाहिजे होते

"भाजपाचे मंत्री ठाण मांडून बसतात, मग शिवसेनेचे का बसले नाहीत?"
सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत झालेल्या पराभवाचे आम्ही नक्की आत्मचिंतन करूच पण केंद्रीय मंत्री नारायण राणे जर जिल्ह्यात ठाण मांडूनही भाजप अधिकची कुमक पाठवत असेल तर प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमचे ही मंत्री ठाण मांडून राहिले पाहिजे होते, अशी खंत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. ते सोमवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका अनारोजीन लोबो,गोविंद वाडकर, प्रतिक बांदेकर, विशाल सावंत आदि उपस्थीत होते.
केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत जरी आमचा पराभव झाला असला तरी त्याना पडलेली मते 2811 आहेत तर आम्हाला पडलेली मते ही 2917 एवढी आहेत त्यानी हे सर्व अभ्यासावे जरी हा विजय झाला असला तरी या धनशक्ती चा आहे मात्र आता यापुढे माझा लढा धनशक्ती विरोधात असून सावंतवाडीत जेव्हा एका हाॅटेल च्या समोर जास्त गाड्या उभ्या होत्या तेव्हा मी पोलीसाना माहिती दिली पण पोलीसांनी दुर्लक्ष केले असा आरोप करत मी याची गंभीर दखल घेतल्याचे केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपचा मोठा पराभव होणार हे जेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांना राणे याच्या दिमतीला पाठवले पण आमच्या कडून तसे झाले नाही एक दोन मंत्री येथे ठाण मांडून बसले पाहिजे होते असे यावेळी केसरकर यानी सांगत खत व्यक्त केली.तसेच आगामी निवडणुकीत मी ठाण मांडून बसणार असल्याचे सांगितले.
तसेच माजी जिल्हा बॅक अध्यक्ष सतीश सावंत याचा पराभव झाला असला तरी त्याना आता कोणते ही मोठे पद देणे गरजेचे असून त्यानी चांगली लढत दिली हे विसरून चालणार नाही त्याच्या मतदार संघात केंद्रिय मंत्री ठाण मांडून होते पैसे मोठ्याप्रमाणात वापर करण्यात आला असा आरोप ही केसरकर यांनी यावेळी केला.