दरड कोसळून कामगाराचा मृत्यू, कळणे मायनिंगमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 16:44 IST2019-04-24T16:43:37+5:302019-04-24T16:44:46+5:30
अनधिकृत उत्खननामुळे वादग्रस्त ठरलेल्या दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील मायनिंगचा भाग बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोसळला आहे. यात मातीत पोकलेन मशीन गाडले गेल्यामुळे आतील कामगार जागीच ठार झाला आहे.

दरड कोसळून कामगाराचा मृत्यू, कळणे मायनिंगमधील घटना
ठळक मुद्देदरड कोसळून कामगाराचा मृत्यू, कळणे मायनिंगमधील घटनाअनधिकृत उत्खननामुळे कायमच वादग्रस्त
सिंधुदुर्गनगरी : अनधिकृत उत्खननामुळे वादग्रस्त ठरलेल्या दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील मायनिंगचा भाग बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोसळला आहे. यात मातीत पोकलेन मशीन गाडले गेल्यामुळे आतील कामगार जागीच ठार झाला आहे.
ही घटना आज दीड वाजण्याच्या सुमारास घडली.त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी काही जण त्याठिकाणी अडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी आणि मायनिंग वर काम करणाऱ्या लोकांनी धाव घेतली आहे. कामगाराचे नाव समजू शकले नाही.