दशावतारी कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार, आमदार नीलेश राणेंच्या आग्रहानंतर सांस्कृतिक मंत्रालयाची दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 17:25 IST2025-05-27T17:22:41+5:302025-05-27T17:25:25+5:30

जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत होते

Dashavatari artists will get a special identity card | दशावतारी कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार, आमदार नीलेश राणेंच्या आग्रहानंतर सांस्कृतिक मंत्रालयाची दखल

दशावतारी कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार, आमदार नीलेश राणेंच्या आग्रहानंतर सांस्कृतिक मंत्रालयाची दखल

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांच्या प्रश्नावर सोमवारी मुंबई येथे संस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या  बैठकीत जिल्ह्यातील दशावतारी कलेला राजाश्रय मिळण्याबरोबरच कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आग्रहाची भूमिका   आमदार नीलेश राणे यांनी  केली.

या मागण्यांबाबत सांस्कृतिक मंत्रालयाने  दखल घेऊन कलाकारांची जिल्हास्तरावर नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा पायलेट प्रोजेक्ट सिंधुदुर्गपासून सुरुवात करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या. त्यामुळे येणाऱ्या काळात दशावतारी कलेबरोबरच कलाकारांनादेखील राजाश्रय मिळण्याचा राजमार्ग अखेर खुला झाला आहे.

जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत होते. परंतु, या मागण्यांना  यश आले नव्हते. यावर या कलाकारांनी आमदार  राणे यांच्याकडे  व्यथा मांडल्या होत्या. त्यानुसार आमदार राणे यांनी सोमवारी आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकाराने राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे दशावतारी कलाकारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विशेष बैठक झाली.

यावेळी सिंधुदुर्ग आणि मुंबईतील सुमारे दोन हजारांहून अधिक दशावतारी कलाकारांची शासन दरबारी अधिकृत नोंद व्हावी, त्याचप्रमाणे या कलाकारांसाठी देण्यात येणारी शासनाची मदत थेट कलाकारांच्या खात्यात जमा व्हावी, सांस्कृतिक मंत्रालयाच्या शिफारस समितीवर कलाकारांना समाविष्ट करून घ्यावे, वृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या मानधनामध्ये  दशावतारी कलाकारांचा अधिकचा वाटा मिळावा, यासाठी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी केली.

सांस्कृतिक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या राज्यस्तरीय समितीमध्ये चार दशावतारी कलाकार व सदस्य यांची नेमणूक करण्याच्या सूचना  मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या. या बैठकीसाठी दत्तमाऊली संस्था सचिव दत्तप्रसाद शेणई, पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ अध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर, कला दिग्दर्शक रूपेश नेवगी, दशावतार हितवर्धक नाट्य संस्था मुंबई अध्यक्ष आशिष गावडे, राजाराम धुरी, श्री देव बुटेश्वर दशावतार नाट्य मंडळ मुंबई सल्लागार विश्राम धुरी, दादा साईल, देवेंद्र सामंत, आदी उपस्थित होते.

Web Title: Dashavatari artists will get a special identity card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.