Dalvi, headmaster of Shankar Mahadev Vidyalaya, dies by corona! | शंकर महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक दळवी यांचा कोरोनाने मृत्यू !

शंकर महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक दळवी यांचा कोरोनाने मृत्यू !

ठळक मुद्देशंकर महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक दळवी यांचा कोरोनाने मृत्यू !कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, हलकर्णी येथील मूळ रहिवाासी

कणकवली : कणकवली तालुक्यातील कुंभवडे येथील शंकर महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत गोविंद दळवी (वय ५४ , रा.हरकुळ बुद्रुक, कणकवली) यांचे कोरोनाने रविवारी निधन झाले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, हलकर्णी या गावचे ते मूळ रहिवासी होते.

कोरोनाचा संसर्ग झाल्याने हनुमंत दळवी यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी दाखल करण्यात आले होते.गेले आठ दिवस त्यांना ताप येत होता. त्यांना मधुमेहाचा खूप त्रास होता. कनेडी येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार त्यांनी घेतले होते.

त्यानंतर कणकवलीत एक खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यासाठी गेल्यावर त्यांना कोविड तपासणी करण्यास सांगण्यात आले होते . आणखीन प्रकृती बिघडल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांना शनिवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कोरोनामूळे रविवारी त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यातच त्यांचे निधन झाले . एक प्रामाणिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम घेणारे शिक्षक म्हणून ते परिचयाचे होते .

शंकर महादेव विद्यालय , कुंभवडे हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची धुरा हनमंत दळवी यांनी २०१३ साली हाती घेतली. भूगोल व हिंदी हे विषय ते विद्यार्थ्यांना शिकवत असत. गेली १९ वर्षे शाळेचा शालान्त परीक्षेचा निकाल १०० टक्के ठेवण्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
त्यांच्या आकत्मिक निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .त्याच्या पश्चात  आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
 

Web Title: Dalvi, headmaster of Shankar Mahadev Vidyalaya, dies by corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.