वायंगणीत समुद्रकिनारी आढळले सिलिंडर, पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 17:35 IST2020-07-04T17:33:36+5:302020-07-04T17:35:05+5:30

वायंगणी समुद्र किनाऱ्यावर आढळून आलेले दोन सिलिंडर वेंगुर्ला पोलिसांनी पंचनामा करीत ताब्यात घेतले.

Cylinder found on the beach in Waingani, seized by police | वायंगणीत समुद्रकिनारी आढळले सिलिंडर, पोलिसांनी घेतले ताब्यात

सिलिंडरच्या पंचनाम्यावेळी पोलीस, सागर सुरक्षा रक्षक व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

ठळक मुद्देसमुद्रकिनारी आढळले सिलिंडर,वायंगणी येथील घटना पोलिसांनी पंचनामा करून घेतले ताब्यात

वेंगुर्ला : वायंगणी समुद्र किनाऱ्यावर आढळून आलेले दोन सिलिंडर वेंगुर्ला पोलिसांनी पंचनामा करीत ताब्यात घेतले.

वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तेथील जयेंद्र येरागी व जयानंद तोरसकर यांना दोन सिलिंडर आढळून आले. ही बाब त्यांनी तेथील सागर सुरक्षा रक्षक सुहास तोरसकर यांच्या निदर्शनास आणून दिली.

सुहास तोरसकर यांनी या सिलिंडरची माहिती वेंगुर्ला पोलिसांत दिली. त्यानुसार वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस डी. जी. पालकर, एम. एम. पाटील, होमगार्ड जी. एस. तोरसकर यांनी तत्काळ वायंगणी समुद्र किनाऱ्यावर जात त्या सिलिंडरची पाहणी केली. या दोन्ही सिलिंडरचा पंचनामा करीत ते ताब्यात घेतले.
 

Web Title: Cylinder found on the beach in Waingani, seized by police