अरुळे येथे चक्रीवादळाचा जोरदार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 14:20 IST2021-05-08T14:18:13+5:302021-05-08T14:20:20+5:30

Rain Sindhudurg : वैभववाडी तालुक्यात अरुळे येथे चक्री वादळाचा जोरदार फटका बसला आहे. गावातील घरे व शौचालयाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Cyclone hits Arule | अरुळे येथे चक्रीवादळाचा जोरदार फटका

अरुळे येथे चक्रीवादळाचा जोरदार फटका

ठळक मुद्देअरुळे येथे चक्रीवादळाचा जोरदार फटका घरे व शौचालयाचे हजारो रुपयांचे नुकसान

वैभववाडी : तालुक्यात अरुळे येथे चक्री वादळाचा जोरदार फटका बसला आहे. गावातील घरे व शौचालयाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेल्यामध्ये महादेव कर्ले, महेश बेळणेकर, अशोक रावराणे यांच्या घरांचे व शौचालयाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वारा व पाऊस झाला.त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली.

वैभववाडीत सध्या आंबा हंगाम सुरू आहे. या हंगामात चार दिवसात तीन वेळा अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Cyclone hits Arule