शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

हिंदळे येथील गंभीर जखमी प्रौढाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 11:52 AM

दुचाकीने जात असताना चक्कर आल्याने पडून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या हिंंदळे येथील देवानंद रामचंद्र पारकर (४०) यांचा कणकवली येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा अपघात मिठबांव-कातवण मार्गावर गोरक्ष गणपती मंदिरानजीक शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास झाला.

ठळक मुद्देहिंदळे येथील गंभीर जखमी प्रौढाचा मृत्यूचक्कर आल्याने दुचाकीसहीत गटारात

मिठबांव : दुचाकीने जात असताना चक्कर आल्याने पडून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या हिंंदळे येथील देवानंद रामचंद्र पारकर (४०) यांचा कणकवली येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा अपघात मिठबांव-कातवण मार्गावर गोरक्ष गणपती मंदिरानजीक शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास झाला.याबाबत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, देवानंद हा शनिवारी सकाळी कातवण येथून मिठबांवकडे दुचाकीने जात असताना मिठबांव गोरक्ष मंदिरानजीक त्याला दुचाकी चालवित असताना चक्कर आली. तो दुचाकीसहीत रस्त्याचा बाजूला असलेल्या गटारात पडला.जखमी अवस्थेत तो गटारात पडलेल्या स्थितीत होता.

याबाबत माहिती समजताच मिठबांव येथील भाई नरे, शैलेश लोके व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मिठबांव येथील रामेश्वर प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने त्याला प्रथम मिठबांव आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत व अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याला कणकणवली येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग