मोबाइलवर मेसेज वाचला म्हणून मारहाण, विवाहितेच्या पती, सासूवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:40 IST2020-06-19T15:36:36+5:302020-06-19T15:40:32+5:30

विवाहितेचा जाचहाट केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात पती, सासूवर गुन्हा दाखल झाला आहे.

Crime against husband, mother-in-law in marital harassment case | मोबाइलवर मेसेज वाचला म्हणून मारहाण, विवाहितेच्या पती, सासूवर गुन्हा

मोबाइलवर मेसेज वाचला म्हणून मारहाण, विवाहितेच्या पती, सासूवर गुन्हा

ठळक मुद्देविवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पती, सासूवर गुन्हामोबाइलवर मेसेज वाचला म्हणून मला मारहाण

सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात पती, सासूवर गुन्हा दाखल झाला आहे.

पती रोहित चंद्रकांत गायकवाड, सासू भारती चंद्रकांत गायकवाड (रा. मंगळवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत विवाहिता सुहासिनी गायकवाड (वय २३, सध्या रा, तारळे, ता. पाटण) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, लग्नानंतर मी चांगली नाही चिडचिड करते असे सासूने खोटे आरोप केले. तसेच पतीने लग्न झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या मोबाइलवर मेसेज वाचला म्हणून मला मारहाण केली.

तसेच पतीने एका कंपनीत कायमस्वरूपी नोकरीस आहे, असे सांगून माज्याशी लग्न केले. तसेच वारंवार पैशाची मागणी करून दारू पिऊन मारहाणही केली. माहेरहून पैसे आणले नाहीत तर धमकीही देत होते. सासू व पतीने मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी.

 

Web Title: Crime against husband, mother-in-law in marital harassment case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.